Marmik
Hingoli live

सेनगाव पंचायत समिती निवडणूक ; 22 गणांची आरक्षण सोडत

मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / पांडुरंग कोटकर:-

सेनगाव – राज्य निवडणूक आयोगाने निर्देशित केल्याप्रमाणे सेनगाव तालुक्यातील एकूण 22 गणातील आरक्षण 28 जुलै रोजी तहसील कार्यालय सेनगाव येथील महसूल हॉलमध्ये काढण्यात आले. यामध्ये जिल्हापरिषदेच्या आरक्षणा प्रमाणेच अनेक जागा या आरक्षित झाल्याने तसेच सर्वसाधारण व मागास प्रवर्गातील महिलांना सुटल्याने अनेकांचा हिरमोड झाला.


सेनगाव पंचायत समिती मधील निर्वाचक गणनिहाय आरक्षणाचा तपशिल पुढील प्रमाणे – सवना मागास प्रवर्ग महिला, कडोळी सर्वसाधारण, गोरेगाव मागास प्रवर्ग, माझोड सर्वसाधारण, बाभुळगाव मागास प्रवर्ग, केंद्रा बुद्रुक सर्वसाधारण, आजेगाव मागास प्रवर्ग महिला, जवळा बुद्रुक अनुसूचित जाती, पानकनेरगाव सर्वसाधारण महिला, कहाकर बुद्रुक मागास प्रवर्ग महिला, जयपुर मागास प्रवर्ग, वटकळी सर्वसाधारण महिला, वरुड चक्रपान अनुसूचित जाती, सिनगी नागा अनुसूचित जाती महिला, साखरा अनुसूचित जमाती, कापडसिंगी सर्वसाधारण महिला, हत्ता नाईक सर्वसाधारण महिला, उटी ब्रह्मचारी सर्वसाधारण महिला, भानखेडा सर्वसाधारण, मकोडि सर्वसाधारण, पुसेगाव सर्वसाधारण महिला, खुडज अनुसूचित जाती महिला या प्रमाणे आरक्षणाची सोडत झाली आहे. यावेळी उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी, तहसीलदार शिवकुमार कांबळे गटविकास अधिकारी शिवलिंग मोरे यांची उपस्थिती होती.

सदरील गणाचे आरक्षण हे उपस्थितांसमोर काढण्यात आले. यासाठी निवडणूक नायब तहसीलदार डि.के. गायकवाड, लिपिक अशोक देशमुख, ऑपरेटर पुरुषोत्तम पुरी यांनी सहकार्य केले.

Related posts

आरक्षण सुटताच अनेकांनी बांधले गुडघ्याला बाशिंग; पक्षांकडून नवीन उमेदवारांची शोधाशोध

Santosh Awchar

वाघजाळी येथे शांततेत पार पडला पोळा सण

Gajanan Jogdand

मोटार सायकल चोरणारी आंतरजिल्हा टोळी जेरबंद! 14 मोटरसायकल सह सात लाखांचा मुद्देमाल जप्त

Santosh Awchar

Leave a Comment