Marmik
Hingoli live महाराष्ट्र

छत्रपतींचा अवमान करणाऱ्या आंध्रप्रदेशच्या गाड्यांचा चुराडा करीन, आमदार संतोष बांगर संतापले!

मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-

हिंगोली – प्रसिद्ध देवस्थान तिरुपती बालाजी येथील चेक पोस्टवर महाराष्ट्रातील वाहनांवरील छत्रपती शिवाजी महाराजांचे स्टिकर व पुतळा काढण्यास भाग पाडले जात आहे. सदरील प्रकाराने शिवसेना हिंगोली जिल्हा प्रमुख तथा कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार संतोष (दादा) बांगर हे चांगलेच संतप्त झाले असून छत्रपतींचा अवमान करणाऱ्या आंध्रप्रदेशच्या गाड्या फोडून चुराडा करीन असा आक्रमक इशारा त्यांनी दिला आहे.

काही दिवसांपूर्वी तिरूमला तिरुपती देवस्थान येथे बालाजी भगवान यांच्या दर्शनासाठी गेलेल्या महाराष्ट्रातील भाविकांच्या गाडीवरील छत्रपती शिवरायांचे स्टिकर व गाडीत असलेला पुतळा काढल्याशिवाय तुम्हाला दर्शन घेता येणार नाही, अशी आडमुठी भूमिका तेथील चेक पोस्टवर घेण्यात आल्याने महाराष्ट्रातील त्या कट्टर शिवभक्ताने सदर घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर टाकून दर्शन न घेता तो भाविक परत आला.

या संदर्भात महाराष्ट्रात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. कळमनुरी विधानसभा मतदारसंघातील येहळेगाव तुकाराम येथील शिवभक्त शिवसैनिक संतोष काळे यांनी याबाबतीत आमदार संतोष (दादा) बांगर यांना फोनवरून ही बाब सांगितली असता आमदार संतोष बांगर साहेब यांनी आक्रमक पवित्रा घेत सदर प्रकरण मी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या कानावर टाकले असून ते लवकरच याबाबतीत आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांशी बोलून यावर तोडगा काढतील.

तसेच उभ्या देशाचे, महाराष्ट्राचे आराध्य दैवत आणि माझ्या देवाचा जर तिरुमला तिरुपती देवस्थान तर्फे अवमान होत असेल तर मी देखील आंध्र प्रदेशची एकही गाडी माझ्या भागात फिरू देणार नाही माझ्या छत्रपतींचा अवमान करणाऱ्या आंध्र प्रदेशच्या गाड्या माझ्या भागात आल्या तर मी त्या गाड्या फोडून चुराडा करून टाकील, असा सज्जड इशारा आमदार संतोष (दादा) बांगर यांनी यावेळी दिला.

Related posts

सेनगाव तहसील कार्यालयावर सुशिक्षित बेरोजगार कृती समितीचे आंदोलन, कंत्राटी पद्धतीचे सरकारी नोकरी भरती व शासकीय शाळांचे खाजगीकरण बंद करण्याची मागणी

Gajanan Jogdand

हट्टा पोलिसांची विशेष कामगिरी: बारा तासात चोरीच्या गुन्ह्यातील आरोपी जेरबंद, मुद्देमाल ही हस्तगत

Santosh Awchar

संविधानातील मुल्यांमुळेच भारतीय लोकशाही जगात सर्वश्रेष्ठ – पालकमंत्री अब्दुल सत्तार

Santosh Awchar

Leave a Comment