Marmik
Hingoli live

समाजाचा रोष पत्करून संस्थेची भरभराट केली, अध्यक्ष भास्करराव बेंगाळ भावनाविवश; विद्यानिकेतन माध्यमिक विद्यालय, कोळसा येथील सहशिक्षक भास्करराव बेंगाळ सेवानिवृत्त

मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / पांडुरंग कोटकर :-

सेनगाव – माझ्याकडे काहीही नसताना मी ही संस्था उभी केली. विनाअनुदानित संस्थेवर काम करीत असताना 1994मध्ये संस्थेची निर्मिती केली 2002 ला मला विद्यानिकेतन माध्यमिक विद्यालय मिळाले. त्यासाठी समाजाचा मोठा रोष पत्करावा लागला मोठ्या कष्टाने ही संस्था भरभराटीस आणली, असे सांगून विद्या शक्ती शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष भास्करराव बंगाळे भावनाविवश झाले.

30 जुलै रोजी संस्थेचे अध्यक्ष भास्करराव बेंगाळ यांच्या सेवानिवृत्त झाले. त्यांच्या सेवानिवृत्ती कार्यक्रमा निमित्त माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर, द्वारकादास सारडा (माजी जिल्हा परिषद सदस्य हिंगोली), संजय भैया देशमुख हे (जिल्हा परिषद सदस्य हिंगोली) दिनकरराव वडकुते (समाज कल्याण आयुक्त) सुनंदा रुपनर, नंदिनी मोरे शिवकांता चिलगर, ललिता शिंदे, कमलाकर मोठे, आनंदीताई बेंगाळ, डॉ. प्राध्यापक ओमप्रकाश चिलगर, शिवाजीराव चिलगर ,प्राचार्य दिगंबर मवाळ मातोश्री सुमनबाई बेंगाळ ,सचिव अंकुशराव बेंगाळ, प्राचार्य अभिषेक बेंगाळ ,बाळासाहेब हाके,ह.भ.प. काशीराम बुवा ईडोळीकर, रवी गडदे ( राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष), वार्ताहार राजकुमार देशमुख, संदीप बहिरे (माजी नगराध्यक्ष), संदीप देशमुख (उपनगराध्यक्ष सेनगाव), गजानन मानकर (नगरसेवक सेनगाव) पिंटू गुजर (पंचायत समिती सदस्य सेनगाव) ,राजू मोरे (माजी जिल्हा परिषद सदस्य हिंगोली),गणेशराव चिलगर ,अमोल खिल्लारी विजय डोळे, एडवोकेट साहेबराव शिरसाट, वार्ताहार मदन शेळक, वार्ताहर सिकंदर पठाण, वार्ताहर जगन्नाथ पुरी, वार्ताहर धुळधुळे, अशोकराव चव्हाण, रंगनाथ पाटील ,दाजीबा पाटील, प्रकाशराव शिंदे, बद्रीनाथ घोंगडे ,धम्मकिरण उबाळे ,शालिक टाले, भीमराव नरवाडे, नंदू गायवाळ, शिवाजीराव गोरे ,भागवतराव वाकळे, आप्पाराव कुंदर्गे, देविदास बोरुडे ,आत्माराम कुंदर्गे, विकासराव शिंदे, गंगाराम फटांगळे, केशवराव मस्के ,प्रकाशराव मस्के, गजानन नखाते, नागरे साहेब, हिंगोली योगा ग्रुप हे सर्व मान्यवर उपस्थित होते.यावेळी प्राचार्य अभिषेक बेंगाळ यांनी प्रास्ताविक पर भाषणामध्ये संस्थेची सर्व रुपरेषा व संस्थेची वाटचाल युनिटच्या संदर्भात माहिती सांगितली.

यावेळी आमदार भाऊराव पाटील यांच्या हस्ते भास्करराव बेंगाळ यांचा भव्य सत्कार करण्यात आला व संस्थेतील पदाधिकारी यांनी सुद्धा साहेबांचा सत्कार करण्यात आला. यावेळी शिवकांता चिलगर यांनी संस्थेची वाटचाल व बेंगाळ यांनी केलेले कष्ट सांगितले. मोरे यांनी संस्थेची वाटचाल सांगितली. माजी आमदार भाऊराव पाटील यांनी बेंगाळ हे कष्ट मेहनत व विद्यार्थ्यांच्या हितासाठी लढणारे शिक्षक आहेत. उपाध्यक्ष आनंदीताई बेंगाळ यांनी सातत्य, मेहनतीमुळे हे सर्व शक्य झाले आहे.

यावेळी अनेक मान्यवरांनी आपले मत मांडले. यावेळी बेंगाळ यांनी आपल्या मनोगतातून बेंगाळ हे भावनाविवश झाले. माझ्याकडे काहीही नसताना मी हे सर्व संस्था उभी केली. विनाअनुदानित संस्थेवर काम करीत असताना 1994 मध्ये संस्थेची निर्मिती केली.2002 ला मला विद्यानिकेतन माध्यमिक विद्यालय मिळाले. त्यासाठी समाजाचा खूप रोष पत्करावा लागला, खूप कष्ट करावे लागले हे त्यांनी सांगितले. यावेळी संस्थेतील सर्व कर्मचारी यांनी बेंगाळ यांना सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा दिल्या.

यावेळी मुख्याध्यापक सानप एस.एस. विद्यानिकेतन प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक व्ही.एस. सरकटे, आश्रम शाळेचे मुख्याध्यापक बाजगिरे बी.जी., पर्यवेक्षक कसाब पी.पी.व शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी बेंगाळ साहेबांचा सत्कार केला व पुढील वाटचालीच्या शुभेच्छा दिल्या.यावेळी सूत्रसंचालन शिंदे आर.बी. यांनी केले व आभार कुटे यांनी मानले.

Related posts

हिंगोली जिल्ह्यातील पाच कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित

Santosh Awchar

जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील झाडे मृत पावू लागली! सामाजिक वनीकरण विभागाचा भोंगळ कारभार

Gajanan Jogdand

जानेवारीतच आदर्श ग्रामपंचायतीस पाणीटंचाईच्या झळा! ग्रामस्थांना पिण्यासाठी पाणी मिळेना!! दाटेगाव ग्रामपंचायतीची पाणीपट्टी थकली!!!

Gajanan Jogdand

Leave a Comment