Marmik
Bhoomika महाराष्ट्र

साहित्यरत्न “भारतरत्न” पासून दुर का?

साप्ताहिकी / विशाल वसंतराव मुळे आजेगावकर :-

एकिकडे महाराष्ट्रात केवळ भाषीक योगदानासाठी भारतरत्न पुरस्कार मिळाल्याचे उदाहरण असतांना मात्र आण्णाभाऊ साठे ह्यांच्यासारख्या अष्ठपैलू नेतृकाकडे सरकारचे दुर्लक्ष असने हे योग्य नाही. एकदा विलासराव देशमुख मुख्यमंत्री असतांना ते एकदा म्हणाले होते की सरकारच्या लक्षात सर्वच बाबी येतील असे नाही. सामान्यातल्या सामान्य माणसांने देखिल सरकारला दुर्लक्षित झालेली बाब लक्षात आणून देणे हे गरजेच आहे.

महाराष्ट्र आणि महाराष्ट्रा बाहेर अण्णाभाऊ साठे ह्यांच्या साहित्याची मागनी खुप मोठ्या प्रमाणावर आहे. मी स्वतः भाग्यनगरला (हैदराबाद) असतांना एका मोठ्या विद्यापीठात भेटीसाठी गेलो होतो. त्या विद्यापीठात सर्वात जास्त वाचक हे अण्णाभाऊ साठे ह्यांच्या साहित्याचे होते. अण्णाभाऊ साठे ह्यांच साहित्याचे योगदान हे साक्षात महर्षि पदाला गवसनी घालनार आहे. त्यांच्या साहित्याने महाराष्ट्रातला तरुन शिकला, त्याला नवीन दिशा मिळाली. आणि त्या दिशेने जात असतांना त्या सर्वांची दशाही बदलली आहे. समाजात कसं जगाव आणि काय शिलाव ह्याचे गणितही महाराष्ट्राच्या तरुनांना मिळाल. महाराष्ट्रात आण्णाभाऊ साठे ह्यांचे साहित्यिक, सांस्कृतिक, वैचारीक, कामगाव विषयक, योगदान आहे. आण्णाभाऊ साठे हे खर्या अर्थाने भारतरत्न आहेत.

आण्णाभाऊ साठे ह्यांचे कार्य आणि त्यांच्या विचाराने महाराष्ट्रात अनेक चाहते निर्मान झाले. एक सामान्यातला सामान्य तरुण ज्यांच शिक्षण जवळ – जवळ नाही इतपत झाले. माझ्या माहिती प्रमाने त्यांचं शिक्षण हे केवळ तिन दिवस झाले. एकिकडे महाराष्ट्रात केवळ भाषीक योगदानासाठी भारतरत्न पुरस्कार मिळाल्याचे उदाहरण असतांना मात्र आण्णाभाऊ साठे ह्यांच्यासारख्या अष्ठपैलू नेतृकाकडे सरकारचे दुर्लक्ष असने हे योग्य नाही. एकदा विलासराव देशमुख मुख्यमंत्री असतांना ते एकदा म्हणाले होते की सरकारच्या लक्षात सर्वच बाबी येतील असे नाही. सामान्यातल्या सामान्य माणसांने देखिल सरकारला दुर्लक्षित झालेली बाब लक्षात आणून देणे हे गरजेच आहे.

चला हे ही मान्य की सरकारच्या ह्या बाबी लक्षात आनून देने आपले काम आहे. एकतर हे लक्षात घ्या की आण्णाभाऊ साठे हे सामान्य माणुस नाही पण तरीही ह्या अगोदर पासून आण्णाभाऊ साठे ह्यांना “भारतरत्न” दिला पाहिजे हे अनेकदा लक्षात आणुन दिलं आहे. आज केंद्र आणि राज्य सरकार ह्या विषयाव खुप सकारात्मक आहेत. फक्त आहे आता गरज त्या साठी एक चळवळ उभी करण्याची… ही चळवळ कशी उभी होईल. त्याचा बिंदू काय असेल ह्यावर आता चर्चा होणे गरजेच आहे हे मात्र खरं आहे..

अनुयायांनी ह्या सर्व विषयातला महत्वाचा बिंदू आहे. कोणत्याही विचाराला मागे नेने वा पुढे ठेवने हे सर्वस्वी अनुयायांच्याच हातात असते असे मला वाटते.. भारताचे घटनाकार, जागतीक कीर्तिचे नेते, पुजनीय भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्यांना ते भारतरत्न आहेत हे मानायला ते 1956 ला गेल्यानंतर भारतरत्न देण्यासाठी 1991 हे साल उजाडाव लागलं. हे दुर्दैव नाही तर काय आहे. आमच्यातली जातीय माणसीकता तेंव्हाही सुधारली नव्हती आणि दुर्दैवाने ती आजही फारसी सूधारली आहे असे वाटत नाही. मात्र ह्या सरकार कडून ह्या अपेक्षा आहेत. कारण ह्या सरकारचे अगदी समाजातल्या शेवटच्या घटकापर्यंत लक्ष आहे असे निदान वाटते तरी..

वरच्या परीच्छेदात मी म्हनल्या प्रमाणे ह्या सर्व विषयाला अनुयायी जबादारी आहेत त्याचे कारन असे आहे की आज खर्या अर्थान आण्णाभाऊ साठे च्या अनुयायांना हे लक्षात घेणे गरजेचे आहे. आण्णाभाऊला न्याय देन्यासाठी त्या अनुयायांना शैक्षणिक, सामाजीक, सांस्कृतिक, राजकिय, आर्थिक संपन्न असने गरजेचे आहे. जो पर्यंत समाजातला समाज आपल्या माणसांसाठी रस्त्यावर येत नाही तो पर्यंत कुणाचेही डोळे उघडत नाहीत. डॉ.बाबासाहेब आंबेडकर ह्यांच्या अनुयायांत आणि आण्णाभाऊंच्या च्या अनुयायांत हाच फारक आहे. आजही आमच्या भाऊंचा समाज दैववादात गुरफटलेला आहे, मरीमायचा पाय तो सोडत नाही, व्यसन सहजा सहजी सोडत नाही, आमच्या तरुनांची अवस्था असी आहे की आमच्या तरुनांना पारंपारीक व्यवसात आवडत नाही, आणि नविन व्यवसाय करायला भांडवल नाही. त्या साठी कोणत महामंडळ नाही. ह्या अशा गर्तेत असलेला आमचा हा समाज आण्णाभाऊ साठे कधी येकत्र येनार. आम्ही आण्णाभाऊना वाचतोय का? हे हे आम्ही लक्षात घेने गरजेचे आहे.

ह्यात एक मी प्रामाणिकपणे मान्य केल पाहिजे की माझ्या सारखा कर्माने आणि जन्माने हिन्दु असनार्याने तरी ह्या समाजाला आपले समजले आहे का? प्रत्येक हिन्दु ह्या हिन्दुना आपला मानलय का? आणि जर माणलय तर मग आम्ही त्यांना आजही मंदिरात थेट प्रवेसग करु देत नाही ह्याला जबाबदार कोण आहे. ह्या विषयी सर्वांना एकत्र करन्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आपल्या समरसता मंच्याच्या माध्यमातून काम करते आहे त्याला हिन्दु म्हनून आपण सहकार्य केलं आणि सर्वानी आण्णाभाऊ साठे साठी एकत्र येउन मागनी केली तर ह्या भारताच्या अष्टपैलू व्यक्तीमत्वास, सरस्वती पुत्रास, कामगार चळवळीच्या अध्वर्युस निश्चित भारतरत्न मिळेल…

Related posts

हिंगोलीत येणाऱ्या प्रमुख राष्ट्रीय व राज्य महामार्गांसह जिल्हाभरात मद्यविक्रीचा महापूर!

Gajanan Jogdand

एकच मिशन जुनी पेन्शन लढा मोडीत निघण्याच्या दिशेने!

Gajanan Jogdand

उद्धव ठाकरे सरकारची कसोटी; उद्या होणार बहुमत चाचणी

Gajanan Jogdand

Leave a Comment