Marmik
Love हिंगोली

हिंगोली नगर परिषदेकडून तिरंगा ध्वज विक्री केंद्र सुरू

मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-

हिंगोली – देशभर आजादी का अमृत महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. यानिमित्त हिंगोली जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या आदेशानुसार व हिंगोली नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉ. अजय कुरवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली नगर परिषदेच्या वतीने शहरात तीन ठिकाणी तिरंगा ध्वज विक्री केंद्र सुरू करण्यात आले आहे.

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत वर्षानिमित्त 15 ऑगस्ट रोजी देशभरात आजादी का अमृत महोत्सव साजरा केला जाणार आहे. यानिमित्त देस वासियात एक उत्साहाचे वातावरण निर्माण झालेले आहे. या आजादी का अमृत महोत्सवानिमित्त हिंगोली जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या आदेशानुसार व नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डॉ. अजय कुरवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली हिंगोली शहरातील गांधी चौक, नगर परिषदेचे जुने कार्यालय येथील अग्निशमन कार्यालय तसेच नगर परिषदेच्या नूतन इमारत येथे तिरंगा ध्वज विक्री केंद्र सुरू करण्यात आले आहे.

5 ते 12 ऑगस्ट पर्यंत तिरंगा ध्वज विक्री केले जाणार असून नागरिकांनी तिरंगा ध्वज विकत घेऊन जावा. तिरंगा ध्वज याची किंमत पंचवीस रुपये ठेवण्यात आली असून 13 ते 15 ऑगस्ट या दोन दिवसात नागरिकांनी आपल्या घरावर तिरंगा ध्वज लावावा. तसेच 15 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 वाजता तिरंगा ध्वज सन्मानपूर्वक खाली उतरवून घ्यावा, असे आवाहन हिंगोली नगर परिषदेकडून करण्यात येत आहे.

यावेळी नगर परिषदेचे उपमुख्य अधिकारी उमेश हेंबाडे, अभियंता रत्नाकर अडसिरे, प्रशासकीय अधिकारी श्याम माळवतकर, कार्यालयीन अधीक्षक देवीसिंग ठाकूर, पंडित मस्के, आशिष रणसिंगे, संदीप घुगे यांच्यासह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

Related posts

‘जिथे कमी तिथे आम्ही’ उपक्रमांतर्गत 18 जूनला गुणगौरव सोहळा

Santosh Awchar

संकल्प बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने हिंगोली येथे वृक्षारोपण

Santosh Awchar

Hingoli एचआयव्ही संसर्गित माताची सर्व बालके एचआयव्ही मुक्त ठेवण्यात एड्स विभागाला यश

Santosh Awchar

Leave a Comment