मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-
हिंगोली – शिवसेना हिंगोली जिल्हाप्रमुख तथा कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार संतोष (दादा) बांगर यांच्या प्रमुख उपस्थितीत येडुद येथे साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 102 वी जयंती मोठ्या उत्साहात संपन्न झाली.
यावेळी बोलताना आमदार संतोष (दादा) बांगर साहेब म्हणाले की तरुणांनी व्यसनाधीनते पासून दूर राहून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांवर चालले पाहिजे आणि आपला व आपल्या समाजाचा उत्कर्ष करून घेतला पाहिजे. पुढे बोलताना आमदार संतोष (दादा) बांगर म्हणाले की, मातंग समाजाच्या लोकांनीच मला सर्वप्रथम नगरसेवक म्हणून निवडून दिले. त्यामुळे मी मातंग समाजाचे उपकार आयुष्यभर विसरणार नाही. येडुद येथील मातंग समाजमंदिरासमोर पेव्हर ब्लॉक आणि मातंग समाज व लिंगायत समाज स्मशानभूमीसाठी निधी देणार तसेच लवकरच कळमनुरी मतदारसंघात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा भव्य पुतळा उभारणार असल्याचे आमदार संतोष (दादा) बांगर यांनी सांगितले.
यावेळी युवा सेना जिल्हाप्रमुख रामभाऊ कदम, जि प सदस्य डी वाय घुगे, सरपंच कैलास घुगे, चेअरमन शिवाजी काळे, सचिन पवार, श्रावण भुक्तर, परमेश्वर आप्पा, हिरामण पउळकर, एम.डी. सावळे,बळीराम पउळकर,सीताराम पउळकर,निवृत्ती पउळकर,श्रीरंग पउळकर,सारंग पउळकर,घनश्याम पउळकर,दशरथ ताकतोडे, गोविंद पउळकर,देविदास पउळकर,केशव हातागळे,गजानन पउळकर,भुजंग पउळकर,पवन पउळकर,विलास ताकतोडे व मोठ्या संख्येने इतर मान्यवर उपस्थित होते.