Marmik
Hingoli live News

…अन्यथा जि. प. प्रशासन आणि इतरांना बांगड्यांचा आहेर करू – विराट राष्ट्रीय लोकमंच कौन्सिल

मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / प्रतिनिधी :-

हिंगोली – हिंगोली जिल्ह्यात शिक्षणव्यवस्थेला मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचाराची कीड लागली असून अशा भ्रष्ट व मुजोर प्रवृत्तीच्या प्राथमिक शिक्षण अधिकाऱ्यांसह लिपिक व इतरांना तात्काळ निलंबित करून त्यांची विभागीय चौकशी सुरू करावी अन्यथा 9 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू करून 10 ऑगस्ट रोजी जिल्हा परिषद प्रशासन व इतरांना बांगड्यांचा आहेर करण्यात येईल, असा इशारा विराट राष्ट्रीय लोकमंच कौन्सिलच्या वतीने देण्यात आला आहे.

माहिती अधिकार 2005 व दफ्तर दिरंगाई कायदा 2006 च्या कायद्याचे उलंघन करणारे अनेक अनियमित कामे करून मोठया प्रमाणावर भ्रष्ट्राचार करत शासनाचा कोट्यावधीच्या निधीचा नुकसान केले असे मुजोर प्रवृत्तीचे शिक्षण अधिकारी (प्राथमिक ) संदिपकुमार सोनटक्के यांच्यासह लिपिक व इतरांना तात्काळ निलंबित करून विभागीय चौकशी सुरु करावी नसता दि.9 ऑगस्ट रोजी पासून हिंगोली जिल्हाधिकाऱ्याला समोर उपोषण सुरू केले जाईल.

तसेच दि 10 ऑगस्ट रोजी जिल्हा प्रशासना मार्फत मुख्यमंत्री महोदय, प्रधान सचिव शिक्षण, आयुक्त शिक्षण, संचालक शिक्षण, विभागीय शिक्षण उपसंचालक, औरंगाबाद, हिंगोली जिल्हा परिषद प्रशासन व ईतरांना बांगडयाचे आहेर देऊन निषेध नोंदविला जाईल असा इशारा विराट राष्ट्रीय लोकमंच कौन्सिल च्या वतीने संस्थापक अध्यक्ष शेख नईम शेख लाल यांनी दिला आहे.

Related posts

सेनगाव येथे कयाधू नदी जनसंवाद यात्रा कार्यक्रम, राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त सरपंच भास्करराव पेरे पाटील यांनी केले मार्गदर्शन

Gajanan Jogdand

सहज मजा मिळाली सजा! तलवारीने केक कापणे तरुणास भोवले; स्थानिक गुन्हे शाखेने ठोकल्या बेड्या

Santosh Awchar

मराठवाडा मुक्ती संग्रामासाठी अनेक हुतात्म्यांनी आणि स्वातंत्र्य सैनिकांनी दिलेल्या लढ्याचे मोल अमूल्य  – रोहयो मंत्री संदिपान भुमरे

Santosh Awchar

Leave a Comment