Marmik
Hingoli live

मुख्यमंत्र्यांचा दौरा आणि कावड यात्रेमुळे वाहतुकीत बदल

मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-

हिंगोली – महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे 8 ऑगस्ट रोजी आमदार संतोष (दादा) बांगर यांच्या कावड यात्रा व मिरवणुक तसेच पक्षाच्या सभेसाठी हिंगोली दौऱ्यावर येत असल्याने मोठ्या प्रमाणात गर्दी होणार आहे. सदर बाब लक्षात घेऊन हदारीस अडथळा निर्माण होण्याची शक्‍यता असल्याने व या कालावधीत शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांनी त्यांना प्राप्त अधिकारान्वये 8 ऑगस्ट रोजी दुपारी 1 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत वाहतुकीत बदल केला आहे.

वाहतुकीसाठी बंद असलेले मार्ग पुढील प्रमाणे – नांदेड नाका ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, मेहरा जुलूम मस्जिद ते इंदिरा गांधी, चौक बुरुड चौक ते महेश चौक, मेडिकल लाईन ते महावीर चौक, सराफा लाईन, कपडा गल्ली, ते गांधी चौक, कोमटी गल्ली ते गांधी चौक, जवाहर रोड ते गांधी चौक, गोलंदाज गल्ली ते गणपती चौक मार्गे रस्त्यावर जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आले आहे. अग्निशामक कार्यालय ते इंदिरा गांधी चौक दरम्यान रस्त्यावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आले आहे. जड वाहनास बंद असलेले मार्ग पुढील प्रमाणे नरसी t-point, खटकाळी बायपास, अकोला बायपास येथून हिंगोली शहरात येणारी सर्व जड वाहनास प्रवेश बंद करण्यात आला आहे.

वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग – औंढा नागनाथ -सेनगाव कडून हिंगोली शहरात व वाशिम च्या दिशेने जाण्यासाठी कयाधु नदी -ईदगाह- नांदेड नाका -जिल्हा परिषद कॉर्नर -बियाणी नगर कॉर्नर -छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौक -रिसाला नाका -अकोला बायपास मार्गे, वाशिम कडून औंढा नागनाथ – नरसी नामदेव कडे जाण्यासाठी रिसाला नाका -छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौक- छत्रपती शिवाजी महाराज नगर- जिल्हा परिषद -नांदेड नाका- कयाधू नदी -नरसी t-point मार्गे, जुन्या शहरातून इतर ठिकाणी जाण्यासाठी मेहरा जुलूम मस्जिद- कब्रस्तान- नांदेड नाका- छत्रपती शिवाजी महाराज नगर- छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौक या मार्गे जवळा पळशी कडून हिंगोली शहरात येण्यासाठी सिद्धार्थनगर आरा मशीन रेल्वे स्टेशन रोड एलआयसी कार्यालय पोस्ट ऑफिस रोड छत्रपती शिवाजी महाराज पुतळा या मार्गे, भागातील नागरिकांना जुन्या शहरात जाण्यासाठी रिसाला नाका, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौक- जिल्हा परिषद – नांदेड नाका – ईदगाह -कब्रस्तान -मेहराज जुलूम मज्जित- फुल मंडी यामार्गे वाहतुकीची पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे.

मुख्यमंत्र्यांच्या सभेसाठी व कावड यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांच्या वाहन पार्किंग करिता पुढील ठिकाणी व्यवस्था करण्यात आली आहे. औंढा नागनाथ नरसी मार्ग येणाऱ्या भाविकांना करिता यांनी टी सी येथे दुचाकी वा चारचाकी वाहन पार्किंग करण्यात आली आहे. कळमनुरी मार्गे येणाऱ्या भाविकांना करिता जिल्हा परिषद मैदान येथे दुचाकी व चारचाकी वाहन पार्किंग करण्यात आली आहे. जवळा पळशी मार्गे येणाऱ्या भाविकांना करिता मार्केट कमिटी येथे दुचाकी व चारचाकी वाहन पार्किंग करण्यात आले आहे. हिंगोली शहरातील वाहनांकरिता ram-leela मैदान येथे मोठ्या प्रमाणात दुचाकी व चारचाकी वाहन पार्किंग करण्यात आली आहे.

Related posts

जिल्हास्तरीय शालेय सुब्रतो मुखर्जी फुटबॅाल कप क्रीडा स्पर्धेचे आयोजन

Santosh Awchar

कोरड्या विहिरीत पडलेल्या इसमाचा भूकबळीने मृत्यू

Jagan

दरोडा, जबरी चोरी व घरफोडी करणारा आरोपी जेरबंद; 6 लाख 1500 रुपयांचा मुद्देमाल जप्त! 13 गुन्हे उघड स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

Santosh Awchar

Leave a Comment