मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / प्रतिनिधी :-
हिंगोली – विराट राष्ट्रीय लोकमंच काऊसींलची राज्यस्तरीय बैठक संस्थापक अध्यक्ष शेख नईम शेख लाल यांच्या अध्यक्षतेखाली दिं.13 ऑगस्ट शनिवार रोजी सकाळी 11.00 वाजता शासकीय विश्रामगृह हिंगोली येथे आयोजीत करण्यात आलेली आहे.
या बैठकीमध्ये मागील बैठकी मधील कार्याचा आढावा घेण्यात येणार असुन संघटन बांधणी, नवीन स्वंयसेवक नोंदणी अभियान, विविध सामाजिक प्रश्न यासंबंधी चर्चा करुन पुढील कार्यक्रमाची रुपरेषा ठरविण्यात येणार आहे. ज्यामध्ये आपल्या स्वंयसेवी संघटनेच्या (NGO) च्या विविध निवेदनाची व पाठपुराव्याची दखल घेत शासनातर्फे व विविध उच्चस्तरीय अधिकाऱ्यांव्दारे देण्यात आलेल्या आदेशाच्या अनुषंगाने पुढील कार्यक्रमाची व पाठपुराव्याची रुपरेषा ठरविण्यात येणार आहे. ते मुद्दे थोडक्यात खालीलप्रमाणेहिंगोली जिल्ह्यासह राज्यातील जि.प.अंतर्गत शाळा तसेच अनुदानीत शाळांची झालेली शैक्षणिक दुरावस्था, शालेय पोषण आहार योजनेतंर्गत होत असलेला भ्रष्ट्राचाराला आळा घालण्यासाठी मागणीप्रमाणे शिक्षण संचालक, पुणे यांच्या आदेशावरुन मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा व तालुका स्तरावर नियमाप्रमाणे भरारी पथकाची स्थापना व अंमलबजावणीसंबंधी पाठपुरावा करणे, आयुक्त (शिक्षण) यांच्या आदेशावरुन सन 2015-16 ते 2019-20 पर्यंत राज्यातील सर्व पात्र शाळांचे शालेय पोषण आहार संबंधीचे लेखापरिक्षणसंबंधी माहिती संकलित करुन लेखापरिक्षणासाठी पाठपुरावा करणे, अनुदानीत शाळांव्दारे RTE कायद्यानुसार आजपर्यंत शालेय व्यवस्थापन समितीची स्थापना केलेली नाही.
अनेक शाळामधील भौतीक सोई सुविधेचा अभाव असुन यु डायस मध्ये चुकीची माहिती आधारे विविध शासकीय योजनांमध्ये होत असलेला भ्रष्ट्राचार इत्यादीसंदर्भात पाठपुरावा व पुढील कार्यवाहीसंबंधी कार्यक्रमाची रुपरेषा ठरविण्यात येणार आहे.
हिंगोली जिल्ह्यात अन्नधान्यमध्ये सर्रासपणे होत असलेले काळाबाजारीकरण, स्वस्त धान्य दुकानदारांचा मनमानी कारभार, पात्र लाभार्थ्याना वंचित ठेवणे व जिल्हा प्रशासनाव्दारे यासंबंधी बाळगण्यात येत असलेली उदासिनता, बडेरा दाम्पत्य यांच्याव्दारे शासनाची फसवणुक, नियमाविरुध्द बांधकाम व डि.पी.रोडच्या जागेवर अतिक्रमण, हिंगोली जिल्ह्यासह संपुर्ण राज्यभरात विविध कार्यालयांव्दारे माहिती अधिकारात मागणी व प्रथम अपिलाच्या आदेशानंतरही जाणुनबुजुन माहिती न देणे, दुय्यम अपिल दाखल केल्यानंतर वर्षानुवर्षे होत नसलेली सुनावणी, संदीप कुमार सोनटक्के शिक्षणाधिकारी (प्राथ./माध्य.) व ईतर जिल्ह्यातील दोषी अधिकारी व कर्मचारी यांच्याव्दारे अनेक अनियमीत कामाव्दारे मोठ्या प्रमाणावर भ्रष्ट्राचार व चल अचल संपत्तीची चौकशी व ईतर विषयावर चर्चा करुन पुढील रुपरेषा ठरविण्यात येणार आहे. सर्वाना यासंबंधी Whatsapp, SMS, Email व मोबाईलव्दारे माहिती देण्यात आलेली आहे. सर्वांनी वेळेवर उपस्थित राहुन सहकार्य करावे असे आवाहन करण्यात येत असल्याचे विश्वासुशेख नौमान नवेदराष्ट्रीय संचालक तथा प्रसिध्दी प्रमुख यांनी कळविले आहे.