Marmik
Hingoli live

हिंगोली येथे शालेय विद्यार्थी रॅली व सामूहिक राष्ट्रगीत गायन

मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-

हिंगोली – आझादी का अमृत महोत्सव’ अंतर्गत ‘हर घर तिरंगा’ मोहिमेच्या निमित्ताने जिल्हा प्रशासनाच्या वतीने हिंगोली  शहरातील शालेय विद्यार्थ्यांची रॅली व राष्ट्रगीत गान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या शालेय विद्यार्थ्यांच्या रॅलीस व राष्ट्रगीत गान कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.यावेळी  हिंगोली शहरातील विविध शाळेतील विद्यार्थ्यांनी तिरंगा ध्वज घेऊन आपल्या शाळेपासून संत नामदेव पोलीस कवायत मैदानापर्यंत प्रभात फेरी (रॅली) काढण्यात आली.

यावेळी शालेय विद्यार्थ्यांनी भारत माता की जय, वंदे मातरम तसेच देशभक्तीपर घोषणा देत परिसर दणाणून सोडला. यानंतर सर्व शाळेतील विद्यार्थ्यांची रॅली येथील संत नामदेव पोलीस कवायत मैदानावर आली. यावेळी पोलीस प्रशासनाच्या बँड पथकाद्वारे राष्ट्रगीत सादर केले. त्याचप्रमाणे अतिशय सुंदर देशभक्तीपर गीतांचे वाद्याच्या माध्यमातून सादरीकरण करण्यात आले.

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत असताना सामूहिक राष्ट्रगीत गायनाच्या माध्यमातून सहभागी विद्यार्थ्यांनी राष्ट्रप्रेम व देशाप्रती आदर व्यक्त करण्याच्या भावनेने जो उत्स्फूर्त प्रतिसाद दिला, त्याबद्दल जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी सहभागी विद्यार्थ्यांचे कौतूक करत उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर,  जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने, जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश कलासागर, शिक्षणाधिकारी संदीपकुमार सोनटक्के, उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी, तहसीलदार नवनाथ वगवाड, गटविकास अधिकारी, गट शिक्षणाधिकारी, जिल्हा प्रशासनातील व तालुका प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी आदी उपस्थित होते.

Related posts

अट्टल दरोडेखोर जेरबंद; देशी बनावटीचे पिस्टल, 6 जिवंत काडतूस जप्त

Santosh Awchar

पोलीस अधीक्षक कार्यालयात श्रमदान

Santosh Awchar

हिंगोलीच्या तापमानाने चाळिशी ओलांडली! नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन

Santosh Awchar

Leave a Comment