मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / पांडुरंग कोटकर :-
सेनगाव – तालुक्यातील जवळा बुद्रुक येथे जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेच्या शालेय व्यवस्थापन समितीची आज 10 ऑगस्ट रोजी बिनविरोध निवड करण्यात आली.
यावेळी बिनविरोध अध्यक्ष म्हणून पांडुरंग इंगोले तर उपाध्यक्ष शिवशंकर राजराम शिंदे तसेच शिक्षण तज्ञ म्हणून परमेश्वरी इंगोले यांची निवड करण्यात आली सेनगाव तालुक्यातील गुणवत्ता प्रथम क्रमांकावर असलेली जिल्हा परिषद केंद्र प्राथमिक शाळा शाळेची आज समिती नेमण्यात आली आहे.
जाहीर झालेली शालेय शिक्षण समिती पुढील प्रमाणे – अध्यक्ष पदी पांडुरंग इंगोले यांची तर उपाध्यक्ष पदी शिवशंकर शिंदे निवड करण्यात आली आहे. शिक्षणतज्ञ :- परमेश्वर शेषराव इंगोले यांची तर सदस्य पदी शिवाजी शिंदे, अनिता राजेश कणसे, दुर्गा रमेश इंगोले, अर्चना ज्ञानेश्वर इंगोले, गोदावरी शिंदे, प्रमिला हनवते, दीपक पंडित, सुरेश बोरकर, अनिता अरविंद कांबळे, अनिता गणेश रोडगे, गजानन जाधव, सुनंदा सिताराम भिसे आदींची निवड करण्यात आली आहे.
यावेळी शाळेचे मुख्याध्यापक शिंदे, ग्रामसेवक केंद्रे, रामरतन शिंदे, सुभाषराव शिंदे, रामप्रसाद इंगोले, प्रल्हाद पाटील, पांडुरंग इंगोले, एकनाथ शिंदे, भगवान शिंदे, नामदेव शिंदे, प्रल्हाद शिंदे माजी अध्यक्ष, राजू पाटील, गंगाराम वाकळे, दत्तराव हनवते, ज्ञानेश्वर इंगोले, किसनराव शिंदे, शंकर इंगोले आदी मोठ्या प्रमाणात गांवकरी उपस्थित होते.