Marmik
Hingoli live

हर घर तिरंगा मोहिमे सोबतच प्रत्येकांनी covid चा बूस्टर डोस घ्यावा – जिल्हाधिकारी पापळकर

मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-

हिंगोली – हर घर तिरंगा मोहीम राबवत असताना घरोघरी प्रत्येकाने कोविड-19 बूस्टर डोस घ्यावा. आजादी का अमृत महोत्सव 75 वर्षे साजरी करत असताना दिनांक 13 ते 15 ऑगस्ट या कालावधीत प्रत्येक घरी राष्ट्रध्वज तिरंगा सन्मानाने लावावा, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले.

यासाठी नगरपालिका तहसील कार्यालयात ध्वज उपलब्ध आहे. सर्व शासकीय निम शासकीय कार्यालयांनी ध्वज संहितेचे पालन करत वरील दिवशी ध्वजारोहण करायचे आहे, असा संदेशही जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी यावेळी  दिला.

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजेंद्र सूर्यवंशी यांच्या आदेशान्वये आज सकाळी सात वाजता आरोग्य विभागाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज पुतळासमोर शहरांमध्ये भव्य तिरंगा प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले होते. या प्रभात फेरीचे उद्घाटन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ.सचिन भायेकर, तहसीलदार नवनाथ वगवाड, गटविकास अधिकारी बोथीकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.नामदेव कोरडे, योग विद्याधामचे रत्नाकर महाजन, ज्यायंट ग्रुपचे अध्यक्ष डॉ. संजय नाकाडे, संजय खिल्लारे, प्रशांत तुपकरी , एलआयसीचे सुधाकर महाजन, प्रदीप आंधळे, रवींद्र भालेराव, पंजाब गायकवाड, मारुती सोलापूरे, गणेश डोके, मल्हारी चौफाडे, रणवीर बोरबले, आरोग्य कर्मचारी, आशा स्वयंसेविका मोठ्या संख्येने उपस्थित होते.या प्रभात फेरीमध्ये सहभागी योग विद्या धाम, तालुका आरोग्य अधिकारी, तहसीलदार, हरी ओम योगा ग्रुप, ज्याएंट ग्रुप ऑफ हिंगोली, जिल्हा वकील संघ, जिल्हा शिक्षक संघटना, जिल्हा आरोग्य अधिकारी, आशा वर्कर संघटना व इतर सहयोगी संघटना यांनी प्रभात फेरीमध्ये सहभाग घेऊन जनजागृती केल्याबद्दल जिल्हाधिकारी श्री. पापळकर यांनी सर्वांचे अभिनंदन केले व पुढील कार्यालय शुभेच्छा दिल्या .

Related posts

मीनाक्षी पवार यांनी घेतला हिंगोली आर एफ ओ पदाचा पदभार, वन पर्यटनाला चालना देणार

Santosh Awchar

निकृष्टतेचा उत्कृष्ट नमुना! नूतन उड्डाण पुलाच्या सुरक्षा कठड्यांपासून डांबरीकरण तुटले; जागोजागी निर्माण झाल्या फटी!!

Santosh Awchar

जयाजी पाईकराव यांना ‘पर्यावरण योद्धा पुरस्कार’ जाहीर

Gajanan Jogdand

Leave a Comment