Marmik
Hingoli live

भोसी येथे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती साजरी; आमदार निधीतून शाळेसाठी संगणक संच देणार – आमदार संतोष बांगर

मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-

हिंगोली – औंढा नागनाथ तालुक्यातील येथे साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 102 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी हिंगोली शिवसेना जिल्हा प्रमुख तथा कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार संतोष (दादा) बांगर यांनी स्थानिक विकास आमदार निधीतून दूर गावातील शाळेसाठी संगणक संच देणार असल्याचे सांगितले.

औंढा नागनाथ तालुक्यातील भोसी येथे हिंगोली शिवसेना जिल्हाप्रमुख तथा कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार संतोष (दादा) बांगर यांच्या प्रमुख उपस्थितीत साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 102 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी आमदार संतोष (दादा) बांगर यांच्या हस्ते ध्वजारोहण करून महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन देखील करण्यात आले.

यावेळी बोलताना आमदार संतोष (दादा) बांगर म्हणाले की लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांनी समस्त मानव जाती च्या कल्याणासाठी आयुष्यभर कार्य केले त्यांचा आदर्श घेऊन समाज बांधवांनी निर्व्यसनी राहून आपल्या समाजाच्या प्रगतीसाठी कार्य केले पाहिजे.

यावेळी युवा सेना जिल्हाप्रमुख राम कदम, राजू नागरे, माणिक दुधाळकर, रमेश राठोड, शरदलाल जैस्वाल, योगीराज राठोड, प्रकाश नावेकर, तुळशीराम दळवी, मोहन जाधव, रमेश जाधव, उत्तम मोधे, आजपाल सिंग, परसराम शिंदे रमेश शिखरे किसनराव जुमडे सचिन जयस्वाल, सुधाकर कांबळे, कैलास कांबळे, रवीकुमार जयस्वाल, संजय जयस्वाल यांच्यासह मोठ्या संख्येने इतर मान्यवर उपस्थित होते.

Related posts

29 जुलैला होणार हिंगोली आइडल _6

Gajanan Jogdand

आरक्षण सुटताच अनेकांनी बांधले गुडघ्याला बाशिंग; पक्षांकडून नवीन उमेदवारांची शोधाशोध

Santosh Awchar

अंतरवाली सराटी लाठी चार्ज प्रकरण: सेनगाव बंद, तर मराठा क्रांती मोर्चा कडून 4 सप्टेंबर रोजी जिल्हा बंदची हाक, काही संघटनांचे पदाधिकारी नजर कैदेत

Gajanan Jogdand

Leave a Comment