Marmik
Hingoli live

लग्नाचे आमिष देऊन 17 वर्षीय मुलीवर अत्याचार; पानकनेरगाव येथील घटना

मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / पांडुरंग कोटकर :-

सेनगाव – तालुक्यातील पानकनेरगाव येथील एका 17 वर्षीय मुलीचे लग्नाचे आमिष देऊन तिला पुणे येथे नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी सेनगाव पोलीस ठाण्यात 21 वर्षीय तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सेनगाव तालुक्यातील पानकनेरगाव येथील वाणी समाजातील एका 17 वर्षीय मुलीला काराळा (तालुका परतुर जिल्हा जालना) येथील 21 वर्षीय तरुणाने सदरील मुलगीही अल्पवयीन असल्याचे माहीत असतानाही लग्नाचे आमिष दाखवून, धमकी देऊन, फुस लावून 3 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट 2022 दरम्यान पानकनेरगाव, रिसोड, इंडियन हॉटेल वाघोली पुणे येथे पळवून नेऊन तिच्या इच्छेविरुद्ध वेळोवेळी जबरी संभोग केला असा जबाब पीडित अल्पवयीन मुलीने दिला आहे.

पीडित मुलीच्या वडिलांच्या फिर्यादीवरून सेनगाव पोलिस ठाण्यात छत्रगुन पुंजाराम सोळंके (रा. काराळा, तालुका परतुर, जिल्हा जालना) या 21 वर्षीय आरोपी तरुणावर भादवि सह लैंगिक अत्याचारापासून बालकांचे संरक्षण अधिनियम 2012 अन्वय गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उपविभागीय पोलिस अधिकारी हिंगोली ग्रामीण, सेनगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रणजीत भोईटे, सहाय्यक पोलीस निरीक्षक दीक्षा लोकडे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शेख खुद्दुस यांनी गुन्हा दाखल झाल्यापासून भेटी दिल्या आहेत. प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शेख खुद्दुस व सहाय्यक पोलीस निरीक्षक दीक्षा लोकडे हे करत आहेत.

Related posts

हिंगोलीत साजरा होणार महासंस्कृती महोत्सव ; जिल्हावाशियांसाठी पाच दिवस कार्यक्रमांची पर्वणी

Santosh Awchar

असोला खून खटल्यातील आरोपीस जन्मठेप! अप्पर सत्र न्यायालय वसमत यांचा निकाल

Gajanan Jogdand

सेनगाव वन विभागाचा पक्षपातीपणा ! आडोळ येथील गट नंबर 22 व 23 वरील अतिक्रमण जैसे थे, विभागीय वन अधिकाऱ्यांनी कारवाई करण्याची मागणी

Gajanan Jogdand

Leave a Comment