Marmik
Hingoli live News

हिंगोली जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा; आमदार संतोष बांगर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-

हिंगोली – जिल्ह्यात सतत अतिवृष्टी झाल्या शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून हिंगोली जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी शिवसेना हिंगोली जिल्हा प्रमुख तथा कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार संतोष (दादा) बांगर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

हिंगोली जिल्ह्यात सतत पाऊस पडत असल्याने अतिवृष्टी झाली आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पहिल्यांदा पेरणी केली, परंतु उगवले नाही म्हणून दुसऱ्यांना पेरणी केली. त्यामुळे पिक फळ कमी झाली असल्याने व सतत पाऊस सुरूच राहिल्याने आणि पावसाच्या पाणी आला पिके पिवळी पडली असून पिकांची वाढ खुंटली आहे.

यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न घटणार असल्याने ओला दुष्काळ जाहीर करणे आवश्यक आहे. सततच्या अतिवृष्टीने हिंगोली जिल्ह्यातील रस्ते पूल वाहून गेले आहेत. वीज पडून ग्रामस्थांचा मृत्यूच्या घटनाही घडलेल्या आहेत. तसेच शेतकऱ्यांचे जनावरेही दगावले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

पीक कापणी चे प्रमाण वस्तुस्थितीत स्वरुपात करण्यात यावी एमडीआरएफ याप्रमाणे हिंगोली जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करून मदत निधी उपलब्ध करून देण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे. या निवेदनावर आमदार संतोष (दादा) बांगर आमदार तानाजी मुटकुळे यांच्या स्वाक्षर्‍या आहेत.

Related posts

हिंगोलीत बसपा चा ‘होऊ शकत है’चा संकल्प

Gajanan Jogdand

हिंगोली पोलिसांचे एकाच वेळी विशेष कोंबिंग ऑपरेशन; तडीपारिचे आदेश जुगारणाऱ्यांवर विविध कलमान्वये कारवाई, फरार आरोपीपैकी एकास शस्त्रासह घेतले ताब्यात

Santosh Awchar

अतिवृष्टीतून वगळण्यात आलेल्या मंडळातील गावांना सरसकट आर्थिक मदत द्या, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे राज्यपालांना निवेदन

Gajanan Jogdand

Leave a Comment