Marmik
Hingoli live महाराष्ट्र

शेगाव येथे श्री श्रावण मास उत्सव; समगा येथील पांडुरंग महाराज सरकटे यांचे झाले कीर्तन

मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-

हिंगोली – श्री गजानन महाराज संस्थान शेगाव येथे श्री श्रावण मास उत्सव कार्यक्रम सुरू आहे. 29 जुलै ते 27 ऑगस्ट या दरम्यान या उत्सवाला अंतर्गत विविध कीर्तनकारांचे कीर्तन संपन्न होत असून हिंगोली तालुक्यातील समगा येथील ह.भ.प. पांडुरंग बुवा सरकटे महाराज यांचे कीर्तन झाले.

श्री गजानन महाराज संस्थान शेगाव येथील श्रावण मास निमित्त श्रावण उत्सव कार्यक्रम सुरू आहे. या कार्यक्रमांतर्गत दररोज सकाळी 5 ते 6 या वेळेत काकडा, साडे आठ ते साडे दहा या वेळेत भजन, दुपारी चार ते पाच या वेळेत प्रवचन, सायंकाळी साडेपाच ते सहा या वेळेत हरिपाठ व रात्री आठ ते दहा या वेळेत कीर्तन होत आहे.

या अंतर्गत 29 जुलै रोजी ह भ प विजय बुवा भामरे, 30 जुलै रोजी ह भ प शिवाजी बुवा शिंदे, 31 जुलै रोजी हभप कृष्णा बुवा चाळीसगावकर, 1 ऑगस्ट रोजी हभप चंद्रभान बुवा सांगळे, 2 ऑगस्ट रोजी ह भ प विठ्ठल बुवा उखळीकर, 3 ऑगस्ट रोजी ह भ प विशाल बुवा खोले चार ऑगस्ट रोजी हभप दिनेश बुवा काकडे 5 ऑगस्ट रोजी हभप भगवान बुवा जगताप, 6 ऑगस्ट रोजी हभप दिनकर बुवा कडगावकर 7 ऑगस्ट रोजी हभप तुकाराम बुवा महाराज, आठ ऑगस्ट रोजी ह भ प महादेव बुवा राऊत नऊ ऑगस्ट रोजी हभप चंद्रकांत बुवा शिंदे, 10 ऑगस्ट रोजी हभप रमेश बुवा महाराज, 11 ऑगस्ट रोजी ह.भ.प. गजानन बुवा महाराज 12 ऑगस्ट रोजी ह भ प शिवाजी बुवा घाडगे, 13 ऑगस्ट रोजी ह.भ.प. प्रकाश बुवा महाराज, 14 ऑगस्ट रोजी ह भ प बाबुराव बुवा तडसे, 15 ऑगस्ट रोजी ह भ प ज्ञानेश्वर बुवा खराडे, 16 ऑगस्ट रोजी ह. भ. प. पांडुरंग बुवा सरकटे, 17 ऑगस्ट रोजी ह.भ.प. सातवी सदानंद बुवा परखंडे कर 18 ऑगस्ट रोजी ह भ प प्रमोद बुवा महाराज, 19 ऑगस्ट रोजी ह भ प संजय बुवा लहाने तर 20 ऑगस्ट रोजी ह-भ-प जगन्नाथबुवा मस्के यांचे कीर्तन झाले.

21 ऑगस्ट रोजी ह.भ.प. आनंद बुवा बिडवे, 22 ऑगस्ट रोजी हभप भागवत बुवा कदम, 23 ऑगस्ट रोजी हभप पंकज बुवा पवार, ह भ प शिवाजी बुवा नेवासेकर, 25 ऑगस्ट रोजी ह भ प भागवत बुवा शिंदे, 26 ऑगस्ट रोजी ह भ प दत्तात्रय बुवा खिर्डी कर यांचे कीर्तन होणार असून 27 ऑगस्ट रोजी हभप सारंगधर बुवा पांडे यांचे काल्याचे किर्तन होणार आहे.

या कीर्तनाचा लाभ घेण्याचे आवाहन श्री गजानन महाराज संस्थान शेगाव यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Related posts

इयत्ता 10 वी परीक्षा: इंग्रजी विषयात 5 विद्यार्थी गैरप्रकार करताना आढळले; भरारी पथकाकडून कारवाई

Santosh Awchar

नंदगाव ग्रामपंचायतीला ग्रामस्थांनी ठोकले कुलूप! ग्रामसेवक गावात येत नसल्याने कामे ठप्प!!

Gajanan Jogdand

व्हाइस ऑफ मीडियाच्या तालुकाध्यक्षपदी जगन वाढेकर, सेनगाव तालुका कार्यकारिणी जाहीर

Gajanan Jogdand

Leave a Comment