मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / प्रतिनिधी :-
हिंगोली – शिवसंग्रामचे अध्यक्ष आमदार विनायकराव मेटे यांच्या अपघाती निधनाने मराठा समाजात मोठी पोकळी निर्माण झाली. सकल मराठा समाजाच्यावतीने सर्वपक्षीय नेत्यांकडून हिंगोली येथे आयोजित शोकसभेत स्व.विनायकराव मेटे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
19 ऑगस्ट रोजी हिंगोली येथील छत्रपती शिवाजी महाराज पुर्णाकृती पुतळा परिसरात मराठा समाजाचे भुषण, शिवसंग्रामचे संस्थापक अध्यक्ष आमदार स्व.विनायकराव मेटे यांच्या अपघाती निधनानंतर शोकसभा संपन्न झाली. छत्रपती शिवरायांना पुष्पहार अर्पण करुन वंदन करण्यात आले. स्व.विनायकराव मेटे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन आदरांजली अर्पण करण्यात आली.
यावेळी आ.तान्हाजी मुटकुळे, माजी उप नगराध्यक्ष दिलीप चव्हाण, हिंगोली जि.प.च्या माजी सभापती रुपालीताई पाटील गोरेगावकर, श्रीमती सुनिताताई मुळे, संजीवनी कन्हेरकर, शिवसंग्रामचे जिल्हाध्यक्ष परमेश्वर पाटील, मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष शिवाजी ढोकर पाटील, खंडेराव सरनाईक, मराठा महासंघाचे विभागीय अध्यक्ष भुषण देशमुख, जिल्हा सरचिटणीस डॉ.प्रल्हाद शिंदे, भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष पप्पु चव्हाण, डॉ.सतिश शिंदे, युवा जिल्हाध्यक्ष बालाजी वानखेडे, कल्याण देशमुख, प्रा.संभाजी पाटील, ऍड.उल्हास पाटील, माजी नगरसेवक शेख शकील, हमीद प्यारेवाले, संदीप वाकडे, जय घोडे, नामदेव शिंदे, सोपान खेडेकर, दत्तराव पडोळे, गजानन गाडे, विजय रोडकर, भाऊराव तुपेकर, नथुराम तावडे, सोनु शिंदे, महेश जाधव, दिलीप घ्यार, कृषी अधिकारी कावरखे, पंडित सिरसाट, गणेश शिंदे, धवसे, प्रितम सरकटे, रवि डोरले, पवन जाधव, राजु जाधव यांच्यासह मराठा समाजाचे बांधव शोकसभेला मोठया संख्येने उपस्थित होते.