Marmik
Hingoli live

एकात्मिक कीड व्यवस्थापन अनुदानाचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा

मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-

हिंगोली – विविध केंद्र पुरस्कृत योजने अंतर्गत राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान कडधान्य व राष्ट्रीय खाद्यतेल तेल अभियान अंतर्गत पिकांसाठी सन 2022-23 या योजने अंतर्गत खरीप व रब्बी अंतर्गत एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन व एकात्मिक कीड व्यवस्थापन या बाबीसाठी पिक संरक्षण औषधे, तणनाशके, जिप्सम, जैविक खते, जैविक कीड नियंत्रण या निविष्ठांसाठी शेतकऱ्यांना किंमतीच्या 50 टक्के कमाल 500 रुपये प्रति हेक्टर याप्रमाणे मर्यादेत लाभ देय आहे.

सध्या खरीप हंगामातील पिकावर कीड रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत असल्याने शेतकऱ्यांना कृषि विद्यापीठाच्या शिफारशीनुसार निविष्ठा खरेदी केल्यास राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान कडधान्य व राष्ट्रीय खाद्यतेल तेल अभियान सन 2022-23 उत्पादन वाढीसाठी निविष्ठा पुरवठा घटक-प्रकल्पा बाहेरील या बाबीसाठी केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार खालीलप्रमाणे अनुदान अनुज्ञेय आहे.

सूक्ष्म मुलद्रव्ये, जिप्सम, जैविक खताच्या एकूण किमतीच्या 50 टक्के कमाल 500 रुपयाच्या मर्यादेत 2 हेक्टर क्षेत्रासाठी देय आहे.

तसेच पिक संरक्षण औषधे, तणनाशके, जैविक कीड नियंत्रण इत्यादी किंमतीच्या 50 टक्के किंवा कमाल 500 रुपये हेक्टर देय आहे. एका शेतकऱ्याला कमाल 2 हेक्टर मर्यादेत लाभ देय आहे.हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी वरील निकषानुसार निविष्ठा खरेदी करुन त्याची खरेदी पावती , सातबारा, आधारकार्ड व बँक खात्यांचा तपशील इत्यादी कागदपत्रे संबंधित तालुका कृषि अधिकारी, मंडळ कृषि अधिकारी कार्यालयाकडे खरीप हंगामासाठी दि. 15 सप्टेंबर 2022 पूर्वी व रब्बी हंगामासाठी दि. 30 डिसेंबर 2022 पूर्वी सादर करावेत. त्यानुसार त्यांना अनुज्ञेय असलेले अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट लाभ हस्तांतर पध्दतीने वर्ग करण्यात येईल.

या योजनेचा लाभ जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी घ्यावा, असे आवाहन शिवराज घोरपडे, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी, हिंगोली यांनी केले आहे.

Related posts

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतले श्री नागनाथाचे दर्शन

Santosh Awchar

जवळा बु. जि. प. शाळेच्या शिक्षकांनी केला मुलांसोबत योगा

Gajanan Jogdand

जिल्ह्यात स्वच्छता ही सेवा अभियान राबविणार – सीईओ नेहा भोसले

Santosh Awchar

Leave a Comment