मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-
हिंगोली – जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या आदेशाने मागील 10 वर्षातील प्रलंबित 419 मिसिंग प्रकरणांपैकी 192 मिसिंग प्रकरणी निकाली निघाली आहेत. यामध्ये 453 पैकी 208 व्यक्तींचा शोध घेण्यात हिंगोली जिल्हा पोलिसांना यश आले आहे.
हिंगोली जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या आदेशाने जिल्हा पोलिसांनी सर्व 13 पोलीस ठाणे अंतर्गत सन 2012 ते माहे जुलै 2022 पावेतो मागील दहा वर्षात प्रलंबित हरवलेले इसम (मिसिंग) यांचा शोध घेण्याबाबत विशेष मोहीम राबविण्यात आली. जिल्ह्यातील प्रलंबित मिसिंग संख्याही जास्त होती.
सदर विशेष मोहिमेची जबाबदारी नोडल ऑफिसर म्हणून स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक राजेश मलपिल्लू यांच्याकडे देण्यात आली होती. सर्व पोलीस स्टेशन मधून मागील दहा वर्षांचे मिसिंग अभिलेखाचे प्रदूषण पडताळणी करण्यात आली. त्यात मागील 10 वर्षात हे पूर्ण 419 मिसिंग प्रकरणे प्रलंबित होती. त्यात एकूण 453 मिसिंग पैकी संख्या ज्यात 241 महिला तर 212 पुरुष अशी संख्या होती.
जिल्ह्यातील सर्व तेरा पोलिस ठाणे अंतर्गत दहा दिवस विशेष मोहिमेत हिंगोली जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर, अप्पर पोलीस अधिक्षक यशवंत काळे, सहाय्यक पोलिस अधिक्षक सतीश देशमुख, उपविभागीय पोलिस अधिकारी विवेकानंद वाखारे, किशोर कांबळे यांच्या मार्गदर्शनात जिल्ह्यातील 13 ही पोलीस ठाण्यातील प्रभारी अधिकारी व त्यांच्या अधिनस्त अंमलदारांनी मोहिमेत विशेष प्रयत्न व कामगिरी करून एकूण प्रलंबित 419 पैकी 192 मिसिंग प्रकरणे निकाली काढली.
यात एकूण 208 ज्यात महिला 121 व 87 पुरुष शोधण्यात पोलिसांना यश मिळाले आहे.