Marmik
Bhoomika महाराष्ट्र

भाजपा म्हणजे “अपवित्र पवित्रोवा”…

साप्ताहिकी / विशाल मुळे आजेगावकर :-

देवेंद्र फडणविस ह्यांच्या दोन पाऊल मागेच्या भूमिकेने त्याची किनार गर्द झाली. ही किनार गर्द होत असतांना दिसली तेंव्हा “मोठी उडी घ्यायची असेल तर मागे यावेच लागते” असे पुस्तकी वाक्य वापरली. आज गडकरीच्या बाबतीत तेच आहे. केंद्रस्थानी विचार कोणताही महाराष्ट्रातला मराठी माणुस पचत नाही हेच खरं आहे. यशवंतराव चव्हाणपासून शरदराव पवार, प्रमोदराव महाजन, नितीन गडकरी पाठोपाठ फडणविस ह्यांची तिच गती आहे असे वाटतेय.

आज महागाईचा आगडोंब प्रचंड वाढतोय. मागच्या सात वर्षात असी एक वस्तु दाखवा की ती महागली नाही. सामान्य मानसांच्या रोजच्या जिवनावश्यक वस्तु मोठ्या प्रमाणात महागल्या आहेत. तरीही लोकं आजपर्यंत तुम्हाला झेलताहेत. ह्या सरकारचे एकमेव हेविवेट मंत्री नितीन गडकरी ह्यांच्या कडील खात्यामुळे रोडचे कामं ज्याला विकास म्हणता येईल तो दिसतोय. त्यामुळेच सामान्य जनता विकास होतोय हे मान्य करतेय. मग त्या दिसत्या रोड मुळे लोकांनी पेट्रोल, डीझेलची महागाई झेलली. आता ते गडकरी डोईजड होतात म्हणुन त्यांचे पंख छाटायला सुरु केले आहे.

गरिबांना मोफत गॅस सिलिंडर दिले. त्यामुळे आपल्यातील बांधवांचा फायदा होतोय त्यामुळे लोकांनी ते ही सहन केलंय. पण आता होत असलेली अन्यधान्यांची महागाई आणि त्यातून होणारे जुमले ह्याला आता जनता त्रस्त आहे. त्यात भ्रष्टाचार तर खुप निघतोय हे मान्य आहे; पण एकही भाजपाचा नेता कसा काय भ्रष्ट नाही हा संशोधनाचा विषय असला तरी मुख्य संशोधन ह्यावर करावे लागेल की एखादा नेता मोठा दुसऱ्या पक्षात असल्यावर प्रचंड भ्रष्टाचारी असतो आणि तोच भाजपात आला की त्याला क्लिनचिट दिल्या जाते हे कसं काय ह्यावर जनतेत मत मतांतरे आहेत…

देशभरात कोणताही नेता घ्या तो कितिही भ्रष्टाचारी असला त्याला ई.डी.लागते. तो चार – सहा महीने प्रचंड त्रासतो. मग त्या नेत्याला “शाहा”नपणा सुचतो आणि मग तो “नरइंद्रा”चा आशिर्वाद घेतो तो लगेच स्वच्छ होतो. त्याला कोणतही बंधन मिळत नाही. एकेकाळी चार ई.डी.ची धाड पडतावेळी चार लोकांनाही न भेटनारा नेता क्लिनचिट मिळाल्यावर मात्र चार चार लाखांच्या सभा घेतो. हा इतका आत्मविश्वास त्याला येतो कुठून? तर तुमचेच त्याला अभय असतं म्हणुन..केंद्राचे सुत्र आता मोदींशिवाय कुणीतरी “शहा”णा माणुस हाताळतांना आज काल जास्त दिसतात.

महाराष्ट्र राज्यात झालेल्या सत्तांतर नाट्याला त्याच माणसांचे आशिर्वाद असल्याची दिल्ली वर्तुळात चर्चा आहे. देवेंद्र फडणविस ह्यांच्या दोन पाऊल मागेच्या भूमिकेने त्याची किनार गर्द झाली. ही किनार गर्द होत असतांना दिसली तेंव्हा “मोठी उडी घ्यायची असेल तर मागे यावेच लागते” असे पुस्तकी वाक्य वापरली. आज गडकरीच्या बाबतीत तेच आहे. केंद्रस्थानी विचार कोणताही महाराष्ट्रातला मराठी माणुस पचत नाही हेच खरं आहे. यशवंतराव चव्हाणपासून शरदराव पवार, प्रमोदराव महाजन, नितीन गडकरी पाठौपाठ फडणविस ह्यांची तिच गती आहे असे वाटतेय. मोदींना राष्ट्रभक्त माणसं आवडतात म्हणे पण आत्ताच्या त्यांच्या जुण्याच पण सध्या जास्त अधीकार दिलेल्या सहकार्याला “राजकिय मुत्सद्दीपणा” असलेली माणसं आवडतात म्हणे. ते ही त्यांच्या पेक्षा मोठी मुत्सद्दी चालत नाहीत हे त्यांचे वैशिष्ट्य आहे..

2014 साला पासून त्या अगोदर पासुन लोकांनी मोदींवर खुप प्रेम केलेय. आजही मोदींच्या लोकप्रियतेत चांगली उंची आहे. मोदी जे सांगतात ते लोकं आजही ऐकतात. मोदींच्या राष्ट्रभक्तीवर कुणिही शंका घेत नाही. अगदी विरोधीही नाही. पण ह्या देशभक्तीचा आता इवेंट वाटतोय. तो व्हावाही त्यालाही दूमत नाही. पण तोच जर विरोधी पक्षाने केला तर तो सहन न होणे ह्याला काय म्हनाल. लोकांनी मोदींना निवडून दिले ते भष्टाचार काबुत करन्यासाठी हो काबूत होतोही. ह्या धाडसत्रातून दिसतंही पण हे सत्र भाजपाच्या भ्रष्ट मंत्र्यांवर का नाही? भाजपात आल्यावर तो “अपवित्र असलेला नेता पवित्र कसा होतो?” ह्या वर आता सामान्य माणसांचे चिंतन चालू आहे.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदींकडून ह्या पेक्षाही मोठ्या कारवाया अपेक्षित आहेत, अगदी सोनिया गांधी, राहूल गांधी हे ही भ्रष्ट असतील तर त्यांनाही अटक करा पण केवळ विरोधी पक्षाच्याच माणसांना नाही तर आपल्या असलेल्याही माणसांवर जेंव्हा कारवाई होईल तेंव्हाच त्याला योग्य न्याय झाला असे म्हनता येईल!न्यायालयीन प्रक्रीयेवर भाषनापुरता विश्वास आता लोकं ठेवतात. हे ही लोकशाहीसाठी चांगले नाही. कॉंग्रेसच्या तिस्ता सेटलवाड ह्यांच्याद्वारे मेनेजक्रिया होती हे मला सांगायची गरज नाही आजही तीच स्थिती असेल तर हे मात्र नक्की चिंताजनक आहे. निदान न्यायालयावर तरी अविश्वास वाढता कामा नये. माझ्या मते सामान्य जनतेचा सत्तेवर अंकूश हवा, आणि सत्तेचा अंकूश हा भ्रष्ट लोकांवर हवा, पण हा अंकुश नेमका आपल्या माजलेल्या हत्तीवर जर माहुत चालवत नसेल तर ते हितकारक असनार नाही..

आज मोदीं समोर सक्षम पर्याय नाही, केजरीवाल ह्यांनी रोहिंग्याना आसरा द्यायची सुरुवात केली ते कधी राष्ट्रीय राजकारणात यशस्वी होतील अशी स्थिती नाही, त्यात फूकट राजकारण राष्ट्राला परवडनार नाही. शरद पवार वयपरत्वे थकलेत. राहूल गांधीत ती क्षमता दिसत नाही. नीतीश कुमारांना प्रांताच्या आणि भाषेच्या मर्यादा आहेत. सर्व विरोधी पक्षाच मतैक्य होईलही पण नेता कोण हे ठरनार नाही. त्या मुळे पुढचे दशक तरी भाजपाशिवाय देशाला पर्याय नाही ही वस्तुस्थिती आहे. भाजपाला लोक त्रासले असही नाही. पण आपला ते बाबा आणि दुसऱ्याचं ते कार्ट अस करुन भाजपाला चालनार नाही. ह्यातून भाजपाने बोध घेतला तर ठिक अन्यथा भाजपाचा प्रवास हा परतिचा व्हायला फारसा वेळ लागणार नाही…

Related posts

तोष्णीवाल महाविद्यालयाच्या एआरटीएम इंग्लिश स्कूलचा बाजारू ‘करिक्युलम’, निवेदन देऊनही गटशिक्षणाधिकारी कारवाई नाही!

Gajanan Jogdand

निवृत्त कर्मचाऱ्यांना मिळणार क्षेत्रीय डाक जीवन विमा अधिकारी म्हणून काम करण्याची संधी

Santosh Awchar

छत्रपतींचा अवमान करणाऱ्या आंध्रप्रदेशच्या गाड्यांचा चुराडा करीन, आमदार संतोष बांगर संतापले!

Gajanan Jogdand

Leave a Comment