मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-
हिंगोली – मागील अनेक दशकापासुन देशविघातक संघटनाव्दारे दोन समाजामध्ये तेढ निर्माण करुन व्देष निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात होता याचीच परिणीती म्हणजे गुजरातमध्ये 2002 मध्ये अत्यंत भयावह दंगली घडविण्यात आल्या. ज्यामध्ये अनेक लोकांचे जिव व वित्तीय हानी मोठ्या प्रमाणावर करण्यात आली.या दंगलीमध्ये बिलकीस बानो हि 5 महिन्याची गर्भवती महिलेवर अनेकांनी अमानुषपणे अत्याचार करुन तिच्या 3 वर्षीय मुलींसह अनेकांची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात सीबीआयव्दारे चौकशी करुन पुर्ण पुराव्यासह न्यायालयामध्ये दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते.
सदर खटल्यामध्ये न्यायालयाने 11 आरोपींना दोषी ठरवुन आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली. त्याविरुध्द मा.उच्च न्यायालय मुंबई येथे अपिल दाखल केले असता उच्च न्यायालयानेसुध्दा सदर आरोपींची जन्मठेपेची शिक्षा कायम ठेवली होती.परंतु गुजरात सरकारने सर्वोच्च न्यायालयाच्या 1992 मधील तरतुदीचा गैरफायदा घेत एक समिती गठीत करुन त्यामध्ये बिजेपी चे अनेक कार्यकर्त्यांचा समावेश करण्यात आला होता. या समितीने अनियमीतपणे एकतर्फी अहवाल गुजरात सरकारला सादर करुन 11 दोषी आरोपींना मुक्त करण्याबाबत शिफारस केली. या शिफारशीचे कारण दर्शवुन गुजरात सरकारने 11 दोषी नराधंमाना शिक्षा माफी देत 15 ऑगस्ट 2022 रोजी मुक्त केले. तुरुगांतुन बाहेर आल्या नंतर 11 दोषींचे भव्य स्वागतही करण्यात आले.
सदर आरोपींचा जाहिर सत्कार करुन अश्या मानसिकतेच्या लोकांचे मनोबल उंचावण्याचे काम करत अनेक मुली व महिलांचे भविष्य आणि आब्रुला अप्रत्यक्षपणे मोठा धोका निर्माण केला गेला आहे.एका महिलेव्दारा आपल्यावर झालेला अन्याय तसेच डोळ्यासमोर झालेल्या हत्येनंतर न्यायपालिकेवर विश्वास ठेवुन दिलेला लढा व तिच्यासारख्या अनेक महिलांचा न्यायपालिकेवर विश्वासाला तडा गेलेला आहे.
2014 नंतर देशात व अनेक राज्यात सत्ता परिवर्तनानंतर अराकतेचे वातावरण निर्माण केले जात आहे आणि एका विशिष्ठ समाजाला वेठीस धरुन त्यावर अन्याय व अत्याचार केले जात आहे. सत्ता कायम ठेवण्यासाठी शासकीय यंत्रणेचा गैरफायदा घेत दबावतंत्राचा गैरवापर करुन सत्ता काबीज ठेवण्यासाठी एका विशिष्ठ समुदायाचे सर्व पध्दतीने आर्थिक व मानसिक खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. दोन समाजामध्ये व्देष निर्माण करुन लहानश्या कारणावरुन कायद्याची पायमल्ली करत अनेकांचे जिवन उध्दवस्त केले जात आहे.
या बाबींच्या विरोधात विराट राष्ट्रीय लोकमंच काऊसींल या राष्ट्रीय NGO च्या वतीने गांधी चौक हिंगोली येथे धरणे प्रदर्शन करुन गुजरात सरकार व केंद्र सरकारचा निषेध नोंदविण्यात आला आहे व मागणी करण्यात येत आहे की, या प्रकरणाची तात्काळ दखल घेऊन सदर 11 दोषांची शिक्षा माफी रद्द करुन तात्काळ आजन्म जन्मठेपेची किंवा फासीची शिक्षा देण्यात यावी अश्या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी मार्फत राष्ट्रपती, मुख्यन्यायाधीश, सर्वोच्च न्यायालय यांना सादर करण्यात आले.
निवेदन देताना संस्थापक अध्यक्ष शेख नईम शेख लाल सह रवि जैस्वाल, नौमान नवेद,मुफ्ती फहीम काजी,अ. सत्तार बागबाण,शाहनवाज हुसेन,शेख अफरोज, मुफ्ती जमीर कासमी,हाजी सय्यद इब्राहिम अली, शेख बासित, शेख अवेज,साजिद खान (लाला), हाजी सय्यद मोहम्मद अली,शेख हनीफ तांबोली, रामेश्वर पवार,आलम खान,रउफ खान,सय्यद गौस, शेख नफिस पहेलवान,कलीम खान, जावेद चाऊस, शेख रहमान, शोएब खान,मो. हाशीर फैजान सय्यद साबेर, जफर, आमेर,तौहीद,मुखीद,आकिब, शकील,सलमान, अफजल,सर्व बागबान,मो.रियाज,अ.रशीद,खालिद पटेल, सय्यद मुनव्वर,शेख मतीन, पठाण समद खान यांच्यासोबत अनेकांची उपस्थिती होती.