Marmik
Hingoli live

ग्रामपंचायतीच्या पाठपुराव्याने वरुड चक्रपान ग्रामपंचायतीचा पाण्याचा प्रश्न मिटला; विद्युत डेपो कार्यान्वित

मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / पांडुरंग कोटकर :-

सेनगाव – तालुक्यातील वरुड चक्रपान ग्रामपंचायतचा पाणीपुरवठा ग्रामपंचायत सदस्यांच्या पाठपुराव्याने कायमस्वरूपी निकाली लागला आहे. त्यामुळे ग्रामस्थांतून आनंद व्यक्त होत आहे. ग्रामपंचायतीने कल्पकतेने यावर मात केल्याने ‘धरण उशाला आणि कोरड घशाला’ ही म्हण खोटी ठरली आहे.

सेनगाव तालुक्यात येलदरी धरणाचा मोठा भाग वसलेला आहे. या भागात अनेक ग्रामपंचायती मोडतात असे असताना या ग्रामपंचायतींना दर उन्हाळ्यात पाणीटंचाईचा सामना करावा लागतो असे सर्वसाधारण चित्र तालुक्यातील येलदरी धरण पायथ्याशी असलेल्या गावांचे आहे.

असे असले तरी तालुक्यातील वरुड चक्रपान या गावचा देखील पाणीपुरवठ्याचा प्रश्न प्रलंबित होता. हा प्रश्न येथील कर्तव्यदक्ष ग्रामसेवक अरुण वाबळे आणि माजी सरपंच बाबाराव कोटकर व ग्रामपंचायत सदस्य यांच्या कल्पकतेने आणि सरपंचांच्या परवानगीने निकाली काढला आहे.

पाणीपुरवठा करण्यासाठी त्यांनी महावितरण कार्यालयाकडून विद्युत डीपी मिळविला आणि गावचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्यात आला.

ग्रामपंचायत सदस्य, सरपंच आणि ग्रामसेवक यांनी यासाठी सतत प्रयत्न केले. त्यांच्या प्रयत्नांना यश आल्याने गावचा पाण्याचा प्रश्न निकाली लागला आहे. ग्रामपंचायत सदस्य सरपंच आणि ग्रामसेवक यांच्या या प्रयत्नांनी धरण उशाला आणि कोरड घशाला ही म्हण खोडून काढली आहे. या नवीन विद्युत डीपीचे केशव पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

यावेळी माजी सरपंच बाबाराव कोटकर, प्रभाकर गोरे, गजानन अवचार, सोनू काळे, कुलदीप काळे, पाणीपुरवठा कर्मचारी सुशील कोटकर आदींची उपस्थिती होती. गावचा पाण्याचा प्रश्न मिटल्याने ग्रामस्थांतून समाधान व्यक्त होत असून ग्रामपंचायत सदस्य, सरपंच आणि ग्रामसेवकांचे गावातील ग्रामस्थांकडून कौतुक केले जात आहे.

Related posts

अधिसूचित सेवांची प्रकरणे निघणार निकाली : 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या दरम्यान राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा राबविण्याचे निर्देश

Santosh Awchar

उद्या हिंगोली लोकसभेचा निकाल, सकाळी 8 वाजेपासून मतमोजणी

Santosh Awchar

अनुसूया बाल विद्या मंदिर येथे रक्षाबंधन साजरे

Gajanan Jogdand

Leave a Comment