मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / पांडुरंग कोटकर :-
सेनगाव – तालुक्यातील जयपूर येथे जलजीवन मिशन कार्यक्रमांतर्गत 29 जुलै सोमवार रोजी मान्यवरांच्या हस्ते जल कुंभाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी जयपूर ग्रामपंचायत पाणी पुरवठा पाईप लाईन साठी 95 लाख रुपये मंजूर झाल्याचे सरपंच संदीप पायघन यांनी सांगितले.
सेनगाव तालुक्यातील विकासाच्या दिशेने वाटचाल करणारे गाव म्हणजे जयपूर हे होय. ग्रामपंचायतचे सदस्य तसेच सरपंच यांच्या नावीन्यपूर्ण संकल्पना आणि उपक्रम जयपुर ग्रामपंचायत राबवत असते. यामुळे जयपुर गावचा सर्वांगीण विकास होत असून गावातील स्वच्छता, वृक्षारोपण आणि इतर काही उपक्रमामुळे या गावाने कात टाकली आहे.
गावचा पाणी प्रश्न सोडविण्यासाठी जलजीवन मिशन कार्यक्रमांतर्गत 29 ऑगस्ट रोजी जल कुंभाचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
गावच्या पाणीपुरवठा पाईपलाईन साठी 95 लाख रुपये मंजूर झाल्याचे सरपंच संदीप पायघन यांनी सांगितले. या योजनेअंतर्गत जयपुर गावातील प्रत्येक कुटुंबास नळाद्वारे पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. त्यामुळे गावचा पाण्याचा प्रश्न सुटणार असून ग्रामस्थांतील समाधान आणि आनंद व्यक्त केला जात आहे.
यावेळी सरपंच संदीप पायघन यांच्यासह ग्राम पंचायतीचे सर्व सदस्य, तंटामुक्ती अध्यक्ष पंढरीनाथ पायघन, ग्रामविकास अधिकारी एस. एस. सपकाळ तसेच ग्रामस्थांची उपस्थिती होती.
येलदरी ते जयपूर दहागाव पाणीपुरवठ्यासाठी 21 कोटी रुपये
जिंतूर आणि सेनगाव तालुक्याच्या सीमा वरती भागात असलेल्या येलदरी धरणातून येलदरी ते जयपूर अशा दहागाव पाणीपुरवठा योजना मंजूर झालेली आहे. या योजनेसाठी 21 कोटी रुपये निधी मंजूर झाल्याचे जयपूर ग्रामपंचायतीच्या वतीने सांगण्यात येत आहे.