Marmik
Hingoli live

नारी शक्ती पुरस्कारासाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन 

मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-

हिंगोली – विपरीत परिस्थितीत महिलांनी केलेल्या असाधारण कार्यासाठी, भारत सरकारतर्फे दरवर्षी इतिहासातील प्रतिष्ठित व प्रसिध्द व्यक्तींच्या नावे, नारी शक्ती पुरस्कार दिला जातो. सन 2022 या वर्षासाठी केंद शासनाकडून नारी शक्ती पुरस्कारासाठी नामनिर्देशन / अर्ज मागविण्यात येत आहेत.

महिलांचे आर्थिक व सामाजिक सबलीकरण, पारंपारिक व अपारंपारिक क्षेत्रात महिलांचे कौशल्य वाढविणे, ग्रामीण महिलांना सोयी सुविधा पुरविणे, विज्ञान व तंत्रज्ञान , खेळ, कला, संस्कृती, महिलांची सुरक्षा, महिलांचे आरोग्य व निरोगीपणा, महिलांचे शिक्षण, कौशल्य विकास या सारख्या अपारंपारीक क्षेत्रात महिलांना प्रोत्साहन देणे, महिलांचा आदर व प्रतिष्ठा वाढविण्यासाठी केलेले कार्य याकरिता, केंद्र शासनाकडून नारी शक्ती पुरस्कार प्रदान केला जातो. प्रत्येक पुरस्कारासाठी भारत सरकारतर्फे रुपये दोन लाख नगद, पुरस्कार व प्रशस्तीपत्र दिले जाते.

पुरस्कारासाठी पात्रता : वैयक्तीक कार्याकरिता नारी शक्ती पुरस्कारासाठी ऑनलाईन अर्ज सादर करावा, वैयक्तीक पुरस्कारासाठी नामांकन दाखल करणाऱ्या व्यक्तीचे वय दिनांक 1 जुलै, 2022 रोजी 25 वर्षांपेक्षा कमी नसावे, अर्जदाराला यापूर्वी लगतच्या वर्षासाठी नारी शक्ती तसेच स्त्री शक्ती पुरस्कार मिळालेला नसावा.

केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार नारी शक्ती पुरस्कारासाठी अर्जदाराने अर्ज योग्य त्या कागदपत्रांसह केवळ ऑनलाईन पध्दतीने www.awards.gov.in  या संकेतस्थळावर भरावयाचे आहेत. फक्त ऑनलाईन पध्दतीद्वारे केलेले अर्जच स्वीकारण्यात येतील.

ऑनलाईन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 31 ऑक्टोबर, 2022 ही आहे. या तारखेनंतर अर्जाची लिंक बंद होईल.जास्तीत-जास्त महिलांनी अर्ज भरावा असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, हिंगोली यांनी केले आहे.

Related posts

कावड यात्रेचे कळमनुरी येथून हिंगोली कडे प्रस्थान; लाखोंचा जनसमुदाय उपस्थित

Santosh Awchar

खटकाळी महादेव मंदिराच्या पुजाऱ्यास लुटणाऱ्या आरोपींच्या स्थानिक गुन्हे शाखेने आवळल्या मुसक्या! एक पिस्टल, तीन जिवंत काडतूसासह तीन लाख 24 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

Santosh Awchar

संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान: हिंगोली तालुक्यातील उमरा गावास विशेष पुरस्कार

Gajanan Jogdand

Leave a Comment