मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-
हिंगोली – येथील जिल्हा कार्यक्रमाधिकारी भाऊ कदम यांची उस्मानाबाद येतील जिल्हा रुग्णालय येथे बदली झाल्याने त्यांचे पद रिक्त होते. या या पदाचा अतिरिक्त कार्यभार हिंगोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील जिल्हा परिषद ज्ञानेश्वर श्रीधरराव चौधरी यांच्याकडे सोपविण्यात आला. त्यांनी 30 ऑगस्ट रोजी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र सूर्यवंशी यांच्या हस्ते या पदाचा अतिरिक्त कार्यभार स्वीकारला.
हिंगोली येथील जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कक्ष (डापकु) जिल्हा रुग्णालय हिंगोली येथील जिल्हा कार्यक्रम अधिकारी उद्धव कदम यांची उस्मानाबाद येथील जिल्हा रुग्णालय येथे बदली झाली. यामुळे सदरील पद रिक्त होते.
या पदावर जिल्हा सामान्य रुग्णालयाचे जिल्हा पर्यवेक्षक ज्ञानेश्वर श्रीधरराव चौधरी यांची निवड करण्यात आली 30 ऑगस्ट रोजी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र सूर्यवंशी यांच्या हस्ते ज्ञानेश्वर चौधरी यांना जिल्हा कार्यक्रम अधिकारी या पदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला.
यावेळी अतिरिक्त जिल्हा शैल्य चिकित्सक डॉ. मंगेश टेहरे, वैद्यकीय निवासी अधिकारी डॉ. गोपाळ कदम, डापकुचे संजय पवार आदींची उपस्थिती होती.
जिल्हा पर्यवेक्षक ज्ञानेश्वर चौधरी यांनी सदरील पदाचा कार्यभार घेतल्याने जिल्हा प्रतिबंध व नियंत्रण कक्ष जिल्हा रुग्णालय हिंगोली हा नव्या जोमाने काम करेल अशी अपेक्षा बाळगण्यात येत आहे. त्यांच्या या निवडीचे जिल्हाभरातून अभिनंदन केले जात आहे.