Marmik
Hingoli live

औंढा नागनाथ तालुक्यात अतिवृष्टी ; बाधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून देणारच, ढोंगी पुढाऱ्यांपासून सावधान – आ.संतोष बांगर

मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-

हिंगोली – राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे औंढा नागनाथ तालुक्यासह संपूर्ण हिंगोली जिल्ह्यातीलच अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची व्यथा शेतकऱ्यां प्रति प्रचंड कळवळा असलेले हिंगोली शिवसेना कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार संतोष (दादा) बांगर यांनी या अगोदरच मांडल्याने औंढा नागनाथ तालुक्यासह हिंगोली जिल्ह्यातील सर्वच अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई ही भेटणारच असल्याचे आमदार संतोष (दादा) बांगर यांनी सांगितले.

दि.23 ऑगस्ट 2022 रोजी आमदार संतोष (दादा) बांगर यांनी औंढा तालुका प्रशासनास औंढा नागनाथ तालुक्यातील जवळपास 35 हजार हेक्टर शेती क्षेत्राचे सतत पडणाऱ्या पावसामुळे व अतिवृष्टीने नुकसान झाल्याचा अहवाल शासन दरबारी मांडण्यास सांगून त्याची अंमलबजावणी ही करून घेतली होती. त्यामुळे मागील वर्षी अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मिळालेल्या भरपाईप्रमाणेच यावेळेस देखील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई ही भेटणारच आहे.

त्यामुळे औंढा नागनाथ तालुक्यासह जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी तथाकथित शेतकऱ्यांचा मित्र असल्याचा बनाव करणाऱ्या ढोंगी पुढाऱ्यांच्या भूलथापांना बळी पडू नये, औंढा नागनाथ तालुक्यासह हिंगोली जिल्ह्यातील अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी आमदार संतोष (दादा) बांगर कटिबद्ध आहेत व राहतील असेही कळविण्यात आले आहे.

पिक विम्यासाठीही शासनाकडे विनंती

अतिवृष्टी व सतत पडणाऱ्या पावसानंतर पावसात पडलेल्या खंडामुळे प्रतिकूल परिस्थितीच्या अधिसूचना काढून पिक विम्याची 25% अग्रीम रक्कम शेतकरी बांधवांना मिळावी यासाठी देखील मी शासनाकडे विनंती केलेली आहे असे देखील आमदार संतोष (दादा) बांगर साहेब यांनी यावेळी सांगितले आहे.

Related posts

सर्व धर्माची शिकवण एकच उपक्रम: पानकनेरगाव येथे विविध कार्यक्रम

Gajanan Jogdand

हिवराजा जाटू ग्रामपंचायत मध्ये संविधान दिन साजरा

Gajanan Jogdand

डॅशिंग पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांची संकल्पना; आरोपींकडून हस्तगत केलेला मुद्देमाल फिर्यादीस केला सन्मानपूर्वक परत, जिल्ह्यात पहिल्यांदाच राबविली एवढी मोठी मोहीम

Santosh Awchar

Leave a Comment