मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / परमानंद तांबिले :-
वाघजाळी – सेनगाव तालुक्यातील वाघजाळी येथील पती-पत्नी शेतातील आखाड्यावर थांबले असता त्यांच्यावर वीज पडून ते दोघेही जखमी झाल्याची घटना 9 सप्टेंबर शुक्रवार रोजी घडली.
सेनगाव तालुक्यातील वाघजाळी येथील शेख गफूर शेख शरीफ व त्यांची पत्नी शयनास बि शेख गफूर हे 9 सप्टेंबर शुक्रवार रोजी त्यांच्या शेतातील आखाड्यावर कानिफनाथ माळाकडे थांबले असता दुपारी तीन वाजेच्या सुमारास विज पडून हे दोघेही पती-पत्नी जखमी झाले. त्यांना तातडीने शेतातील शेतकरी व ग्रामस्थांनी आणि नातेवाईकांनी हिंगोली येथील जिल्हा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.
सध्या परतीचा पाऊस पडत असून ढगांच्या गडगडाटासह आकाशात विजा चमकत आहेत. यापासून बचाव करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून जनजागृती केली जात आहे.
दामिनी ॲपचा वापर करण्याबाबतही जिल्हा प्रशासनाकडून आवाहन केले जात आहे.