मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / प्रतिनिधी :-
हिंगोली – जिल्ह्यातील पाच तालुक्यासह वसमत, औंढा नागनाथ ,कळमनुरी ,सेनगाव, हिंगोली तालुक्यातील सर्व अवैध धंदे बंद करण्याची मागणी करण्यात आली आहे.
हिंगोलीसह सर्व तालुक्यातील तसेच ग्रामीण शहरी भागात बहुतांश ठिकाणी मटका, तितली भवरा, देशी ,विदेशी दारू, पत्याचे डाव, अवैध वाहतूक, गुटखा, विमल , सितर, गोवा, पुड्या विक्री व इतर अवैध धंदे जोमाने सुरू असून या संदर्भात पोलिस अधीक्षक यांना वेळोवेळी अवैध धंदे बंद करण्या बाबत निवेदन देण्यात आले आहे.
मात्र याची कोणतीही दखल घेण्यात आली नाही. कारण या मध्ये काही लोकप्रतिनिधी हे अवैध धंदे करतात. त्यांच्या दबावाला बळी पडून किंवा दबावाखाली येऊन कारवाई करत, परंतु कायदा हा सर्वासाठी सारखा आहे.
आमदार, खासदार, मंत्री यांना वेगळा कायदा नाही. बहुतांशी ठाणेदार हप्ते घेतात. त्यामुळे कारवाई होत नाही. अवैध धंदे करणाऱ्या लोकांना पाठीशी घालत आहेत.
जिल्ह्यात सुरू असलेले सर्व अवैध धंदे तात्काळ बंद करण्यात यावे, अशी मागणी बहुजन समाज पार्टी जिल्हाध्यक्ष ॲड. प्रज्ञावंत मोरे यांनी विशेष पोलिस महानिरीक्षक नांदेड यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.