मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / प्रतिनिधी :-
हिंगोली – हिंगोलीत ‘होऊ शकत है’ राज्यस्तरीय’ ‘शासक बनो’ कार्यकर्ता प्रशिक्षण अभियानांतर्गत विशेष कार्यक्रमाचे आज, सोमवारी (१२ सप्टेंबर ) विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.महाराष्ट्र प्रदेश प्रभारी प्रमोद रैना, प्रदेश प्रभारी मनीष भाऊ कावळे साहेब प्रामुख्याने उपस्थित होते.
मान्यवर कांशीराम साहेब यांच्या विचारानुसार बहुजन चळवळीतून ‘शासनकर्ती’ जमात उभी करण्यासाठी ध्येयनिश्चिती च्या दिशेने वेगाने मार्गक्रमण करण्याची हिच योग्य वेळ आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत बहुजनांची दिशाभूल करीत सत्ता उपभोगणाऱ्या पक्षांचा ‘करेक्ट कार्यक्रम’ करा, असे आवाहन प्रमोद रैना यांनी केले.
कार्यक्रमात प्रदेश महासचिव दिगंबर ढोले, रवींद्र गवई, प्रदेश सचिव, देवराव भगत, अविनाश वानखडे, प्रदेश ,जिल्हा प्रभारी रमेश भिसे पाटील,जिल्हा अध्यक्ष एडवोकेट प्रज्ञावंत मोरे ,जिल्हा उपाध्यक्ष ईश्वर जोंधळे, जिल्हा महासचिव राजेश जोंधळे, जिल्हा सचिव गौतम घोंगडे, गजानन नगरे, बी.व्ही.एफ संदीप पुंडगे, भगत, गौतम खडसे तसेच सर्व विधानसभा मतदार संघातील प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते आणि हितचिंतक प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी जिल्हा अध्यक्ष एडवोकेट प्रज्ञावंत मोरे यांनी ही मागदर्शन केले आणि आगामी काळात बहुजन समाज पार्टी हिंगोली जिल्ह्यामध्ये हतीला निवडून येण्या साठी कामाला लागा असे आवाहन केले.