Marmik
Hingoli live

विद्याशक्ती शिक्षण प्रसारक मंडळ कोळसा येथे मराठवाडा मुक्ती संग्राम दिन साजरा

मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / पांडुरंग कोटकर :-

सेनगाव – विद्याशक्ती शिक्षण प्रसारक मंडळ कोळसा येथे 17 सप्टेंबर 2022 रोजी मराठवाडा मुक्ती संग्राम दिन मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात आला. यावेळी विद्याशक्ती शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष भास्करराव बेंगाळ यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला.

यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे व्याख्याते प्राध्यापक पवार (मेहकर),भगवान वाघमारे ,कवी शिवाजीराव कराळे, ॲड. साहेबराव शिरसाट, प्रकाशराव पाटील,गजानन निखाते, ॲड. दीपक रणबावळे, शेकुराव शिंदे सरपंच ,देवराव बोरुडे ,वैजनाथ पावडे ,गुलाबराव वाव्हळ ,विवेक कोल्हे ,रामेश्वर पावडे, जावेद भाई, दत्ता तोंडे, संतोष वाव्हळ तंटामुक्ती अध्यक्ष, बालाजी कुरवाडे,गजानन झुंगरे, संतोष साळवे ,चिनकाजी अवचार, सत्कारमूर्ती शंतनु ओमप्रकाश चिलगर नीट मध्ये 597 प्रेरणा शिरसाट यांचा संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला.

यावेळी संस्थेच्या उपाध्यक्ष आनंदीताई बेंगाळ ,सचिव अंकुशराव बेंगाळ ,प्राचार्य अभिषेक बेंगाळ, मुख्याध्यापक शिंदे आर. बी., प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक सरकटे वरही. एस., बाजगिरे , पर्यवेक्षक कसाब हे उपस्थित होते.यावेळी प्रास्ताविक प्राध्यापक माटे यांनी केले .मराठवाडा स्वातंत्र्य संग्रामाचा इतिहास सांगितला.

तसेच संस्थेच्या वतीने बेंगाळ यांनी सर्व कर्मचाऱ्यांचा सत्कार केला. प्रकाशराव पाटील यांनी मराठवाड्यातील संपत्ती इंग्लंडमध्ये जमा आहे हे सांगितले. तर ॲड. साहेबराव शिरसाट यांनी आपली लोकशाही सांगितली.

प्रवाहाचा विरुद्ध दिशेने चालतो त्याचा इतिहास लिहिला जातो.तसेच प्राध्यापक पवार यांनी लोकशाही शिवाजी महाराजांचा इतिहास मराठवाड्याच्या इतिहास यावर प्रखर मत मांडले.

अध्यक्षीय समारोप मध्ये भास्करराव बेंगाळ यांनी संस्था ही नेहमी गुणवंत विद्यार्थ्यांच्या पाठीशी असते. संस्थेमध्ये कोणत्याही विद्यार्थ्याला शैक्षणिक सुविधा कमी पडू देणार नाही. वेगवेगळे कोर्स आणून ग्रामीण भागाचा विकास केला जाईल असे सांगितले.

यावेळी सूत्रसंचालन पायघन बी.डी यांनी केले व आभार काळे बी.के यांनी मानले. यावेळी सर्व कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

Related posts

वडीलावरील कर्जाच्या चिंतेने शेतकऱ्याच्या मुलाची आत्महत्या! बाभळीच्या झाडाला घेतला गळफास

Jagan

हाच का आपला स्वभाव स्वच्छता आणि संस्कार स्वच्छता

Gajanan Jogdand

विद्याशक्ती शिक्षण प्रसारक मंडळ कोळसा येथे भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव दिन साजरा

Gajanan Jogdand

Leave a Comment