मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-
हिंगोली – येथील जिल्हा जिल्हा परिषद पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आत्माराम एल. बोंद्रे यांनी हिंगोली जिल्हा परिषद पंचायत विभागाचा नुकताच पदभार घेतला आहे. यानिमित्त त्यांचे मार्मिक महाराष्ट्र समूहाचे संपादक गजानन जोगदंड यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
हिंगोली जिल्हा परिषद पंचायत पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विशाल राठोड यांची मंत्रालयात नियुक्ती झाल्याने सदरील पद रिक्त होते.
सदरील पदाचा अतिरिक्त कार्यभार हिंगोली जिल्हा परिषद पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आत्माराम बोंद्रे यांच्याकडे देण्यात आला. यानिमित्त त्यांचे 19 सप्टेंबर रोजी मार्मिक महाराष्ट्र समूहाचे संपादक गजानन जोगदंड यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
उपमुख्य कार्यकारी अधिकारी आत्माराम बोंद्रे यांनी सदरील पदाचा पदभार घेतल्यानंतर प्रलंबित कामांचा निपटारा केला जात आहे. त्यांच्या कामाची पद्धत, कार्यतत्परता यामुळे त्यांच्याकडे येणाऱ्या प्रत्येक जणच त्यांच्या कामाने प्रभावित होत आहे. तात्काळ काम केले जात असल्याने नागरिक आणि कर्मचाऱ्यांतूनही समाधान व्यक्त होत आहे.
तत्कालीन उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विशाल राठोड यांच्या कार्यकाळात पंचायत विभागातील विविध कामे प्रलंबित आहेत. तसेच तत्कालीन उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विशाल राठोड हे बहुतांश वेळा कार्यालयात हजर नसल्याने अनेकांना त्यांची भेट होतच नव्हती.