Marmik
Hingoli live

अधिसूचित सेवांची प्रकरणे निघणार निकाली : 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या दरम्यान राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा राबविण्याचे निर्देश

मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-

हिंगोली – सर्व सामान्य जनतेची कामे विहित कालावधीत व्हावीत यासाठी राज्य शासनाने सन 2015 मध्ये आपले सरकार सेवा पोर्टल सुरु केले आहे. त्या माध्यमातून जनतेची कामे विहित कालमर्यादित पूर्ण होणे अपेक्षित होते. तथापि या पोर्टलचा आढावा राज्य शासनाने घेतला असता नागरिकांडून प्राप्त होणारे अनेक प्रकरणे संबंधित नागरिकांचे अर्ज, तक्रारी विहित कालमर्यादेत निपटारा होत नसल्याचे निदर्शनास आले आहे.या पार्श्वभूमीवर सर्व विभागांचे अधिसूचित सेवा प्रकरणे, अर्ज/तक्रारी यांचा निपटारा करण्यासाठी दि. 17 सप्टेंबर, 2022 ते 02 ऑक्टोबर, 2022 या कालावधीत राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवाडा राबविण्याचे शासनाने निश्चित केले आहे.

या कार्यक्रमाचे पत्र सर्व विभागाचे विभाग प्रमुख व तालुकास्तरीय उप विभाग, गट विकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी यांना देण्यात आलेले आहे. तसेच माहे ऑगस्ट, 2022 अखेर प्रलंबित आपले सरकार सेवा हमी प्रलंबित प्रकरणांचा अहवाल देखील पंचायत समितीना देण्यात आलेला आहे. ही प्रकरणे गट विकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, बाल विकास प्रकल्प अधिकारी, गट शिक्षणाधिकारी व अधिनिस्त सर्व ग्रामपंचायतीनी तात्काळ निकाली काढण्याये निर्देश देण्यात आलेले आहेत.

परंतु अर्जदार यांनी आपली जन्म, मृत्यु, राहिवाशी, विवाह झाल्याचे प्रमाणपत्र, निराधार व विधवा असल्याचे प्रमाणपत्र, मालमत्तेचे नमुना नं.8. जागेच्या कराची मागणीपत्र, तसेच शौचालय प्रमाणपत्र असे विविध प्रमाणपत्रासाठी आवश्यक ते पुरावे सोबत आणणे आवश्यक आहे.तसेच दि.23 सप्टेंबर, 2022 रोजी ही प्रकरणे/ अर्ज निकाली काढण्यासाठी तालुकास्तरावर ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी यांचे कॅम्प आयोजित करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत.

या कॅम्प आयोजनाबाबत विविध सामाजिक प्रसिध्दी माध्यमाव्दारे गावस्तरावर माहितीस्तव मोठ्या प्रमाणात प्रसिध्दी द्यावी.

तालुका व ग्रामपंचायत स्तरावर आयोजितत केलेल्या कार्यवाहीचा प्रगती अहवाल 03 ऑक्टोंबर, 2022 पर्यंत सादर करावेत, अशा सूचना सर्व संबंधीतांना देण्यात आलेल्या आहेत, असे उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पं.), जिल्हा परिषद, हिंगोली यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

Related posts

वर्कशॉप, शेतातील मोटार व इतर साहित्य चोरी करणारी टोळी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

Santosh Awchar

सराईत गुन्हेगार वर्षभरासाठी हिंगोली जिल्हयातुन हद्दपार

Santosh Awchar

शेतकऱ्यांना उच्च प्रतिचे बियाणे मिळण्यासाठी विशेष प्रयत्न करा- जिल्हाधिकारी, भरारी पथकांमार्फत कृषि निविष्ठा केंद्रांवर लक्ष

Santosh Awchar

Leave a Comment