मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / पांडुरंग कोटकर :-
सेनगाव – तालुक्यातील आजेगाव, गोरेगाव, पुसेगाव व बाबुळगाव या चार महसूल मंडळातील गावांना अतिवृष्टीतून वगळण्यात आले. सदरील मंडळातील गावच्या शेतकऱ्यांना सरसकट आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे महाराष्ट्र राज्य प्रदेश सचिव परमेश्वर इंगोले पाटील यांनी राज्यपालांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
जून ते ऑगस्ट या कालावधीत हिंगोली जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होऊन शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले. नुकसान भरपाई म्हणून आपल्या शासनाच्या माध्यमातून नुकसान भरपाई अनुदान मंजूर सुद्धा करण्यात आले, परंतु यामध्ये सेनगाव तालुक्यातील चार महसूल मंडळातील 58 गावांना यामधून जाणीवपूर्वक वगळण्यात आले आहे.
अतिवृष्टी सर्वत्र हिंगोली जिल्ह्यात झाल्यामुळे मोठ्या अतिवृष्टी झाली होती त्यामध्ये सर्व तालुक्यातील सगळ्याच गावांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, पण हेतू पुरस्कर चार महसूल मंडळांना यामधून वगळण्यात आलेले आहे. यामुळे या 58 गावातील शेतकऱ्यावरती मोठ्या प्रमाणात अन्याय झाल्याची प्रतिक्रिया शेतकरी वर्गातून नाराजी दिसून येत आहे. यामुळे शेतकरी नैराश्यग्रस्त झालेला आहे.
संबंधित गावातील शेतकऱ्यांनी अनुदानात वगळल्यामुळे रस्त्यावरती उतरून आपला संघर्ष चालू केलेला आहे. शेतकऱ्यांमध्ये या 58 गावातील मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. आजेगाव,बाभूळगाव ,पुसेगाव, गोरेगाव ,या चार महसूल मंडळातील शेतकरी रस्त्यावरती उतरून आपल्या न्याय हक्कासाठी लढत आहेत.
अतिवृष्टी पासून वंचित असलेल्या सेनगाव तालुक्यातील आजेगाव, बाभुगाव, पुसेगाव, गोरेगाव, या चार महसूल मंडळातील 58 गावाचा अनुजनामध्ये समावेश करून या सर्व शेतकऱ्यांना आर्थिक लवकरात लवकर मदत करावी जेणेकरून या शेतकऱ्याला उभारी मिळेल, असे निवेदनात म्हटले आहे.