मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-
हिंगोली – आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त घेण्यात आलेल्या फेस पेंटिंग स्पर्धेचे 22 सप्टेंबर रोजी बक्षीस वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. रोख रक्कम, प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ असे या पुरस्काराचे स्वरूप होते.
महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटी मुंबई अंतर्गत जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कक्ष सामान्य रुग्णालय हिंगोली यांच्या वतीने 12 ऑगस्ट ते 26 ऑगस्ट 2022 या कालावधीत आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्ताने जिल्हाभरात विविध कार्यक्रम स्पर्धा व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले होते. तसेच हर घर झेंडा आणि एचआयव्ही एड्स या विषयी फेस पेंटिंग स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हास्तरावर यामध्ये घेण्यात आलेल्या या स्पर्धेत जिल्ह्यातील विविध महाविद्यालयीन युवक युवती यांनी सहभाग नोंदवला.
सदरील स्पर्धेत प्रथम क्रमांक वर्षा राजू जळते या युवतीने पटकावला तर द्वितीय क्रमांक बेकटे नेहा परमेश्वर हिने पटकावला. तसेच मोहिनी विलास कांबळे या विद्यार्थिनीने तृतीय क्रमांक पटकावला तर उत्तेजनार्थ श्यामल रोहिदास नरवडे, सुशीला भालेराव आदींना बक्षीस देण्यात आले.
विजेत्यास हिंगोली जिल्हा शिल्लक चिकित्सक डॉ. राजेंद्र सूर्यवंशी, वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रकाश कोठुळे, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक तथा जिल्हा पर्यवेक्षक ज्ञानेश्वर चौधरी, प्राचार्य भालेराव यांच्या हस्ते बक्षिसांचे वितरण करण्यात आले. रोख रक्कम, प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ असे या पुरस्काराचे स्वरूप होते.
या स्पर्धेचे परीक्षक म्हणून शिवाजी महाविद्यालयाचे प्रा. डॉ. श्रीराम कऱ्हाळे, बाबुराव पाटील महाविद्यालयाचे प्रा. डॉ. कृष्णा इंगळे, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक ज्ञानेश्वर चौधरी यांनी काम पाहिले. याप्रसंगी कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक ज्ञानेश्वर चौधरी यांनी एचआयव्ही एड्स विषयी व आंतरराष्ट्रीय युवा दिनाचे तसेच आयोजित स्पर्धेविषयी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व उपस्थितितांचे आभार समुपदेशक बालाजी चाफाकानडे यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी आशिष पाटील, संजय पवार, टीना कुंदनानी आदींनी परिश्रम घेतले.