मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / मनोज जयस्वाल, संतोष अवचार :-
हिंगोली – औंढा नागनाथ तालुक्यातील भोसी येथील गट क्रमांक 5 मधील अतिक्रमण काढण्याच्या मागणीसाठी येथील अर्जदारांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 26 सप्टेंबर पासून आमरण उपोषण सुरुवात केली आहे.
भोसी येथील मारुती कोंडबा मोघे यांनी हिंगोली जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन सहपरिवार 26 सप्टेंबर पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अमरण उपोषण सुरू केल्या मोघे यांच्या जागेपुढे गावातील काही लोकांनी अतिक्रमण करून त्यांचा शेतात जाण्याचा रस्ता बंद केला आहे. त्यामुळे त्यांना शेतातून शेतमालाची ने – आण करताना अनंत अडचणी येत आहेत.
सदरील अतिक्रमण काढण्यासंदर्भात या आधीही त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयास 29 जुलै 2022 रोजी तसेच 18 ऑगस्ट 2022 रोजी निवेदन दिले आहे; मात्र या निवेदनाची कोणत्याही प्रकारे दखल न घेण्यात आल्याने मारुती मोघे यांनी सहपरिवार 26 सप्टेंबर पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. अतिक्रमण काढून देण्यात यावे अशी मागणी त्यांनी केली आहे.
या निवेदनावर मारुती मोघे नामदेव मोघे शिवाजी मोघे, भिवाजी मोघे, नारायण मोघे, शांताबाई मोघे, चांगुणाबाई मोघे, वंदनाबाई मोघे, रुक्मिना मोघे आदींची नावे आहेत.