मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार, मनोज जयस्वाल :-
हिंगोली – औंढा नागनाथ तालुक्यातील दुधाळा येथे एका शेतकऱ्याने त्याच्या शेतातील कापूस व तुरीच्या उभ्या पिकात गांजाची झाडे लावल्याची आढळून आली. याप्रकरणी औंढा नागनाथ पोलीस ठाण्यात हिंगोली येथील स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराय यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
27 सप्टेंबर रोजी हिंगोली येथील स्थानिक गुन्हे शाखेस मिळालेल्या गोपनीय बातमीदारा मार्फत औंढा नागनाथ तालुक्यातील दुधाळा येथील नामे विष्णू जाधव याने त्याच्या शेतातील पिकांमध्ये गांजाची झाडे लावल्याची माहिती मिळाली.
सदरील माहिती भरून हिंगोली जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांच्या मार्गदर्शनात हिंगोली येथील स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराय यांनी तपास पथक व पंचासह दुधाळा गावातील विष्णू जाधव यांच्या शेतात जाऊन पाहणी केली असता विष्णू शंकर जाधव याच्या शेत गट क्रमांक 431 मधील कापूस व तुरीच्या उभ्या पिकात ओळीने विनापरवाना शासनाने प्रतिबंधित केलेली गुंगीकारक वनस्पती गांजाची एकूण लहान-मोठे असे 63 झाडे मिळून आली.
सदर गाण्याच्या झाडाचे वजन काट्यावर मोजमाप केले असता 51 किलो 500 ग्राम ही झाडे भरली ज्याची किंमत एकूण 3 लाख 9 हजार रुपये एवढे आहे.
सदरील मुद्देमाल जप्त केला असून हिंगोली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उदय खंडेरायांच्या तक्रारीवरून औंढा नागनाथ पोलीस ठाण्यात आरोपी विष्णू शंकर जाधव राहणार दुधाळा याच्या विरुद्ध भादंविच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई हिंगोली जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराय, सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश मलपिल्लू, सहायक पोलीस निरीक्षक सुनील गोपीनवार, पोलीस अंमलदार संभाजी लेकुळे, सुनील अंभोरे, नितीन गोरे, राजूसिंग ठाकूर, ज्ञानेश्वर सावळे, किशोर सावंत, विठ्ठल काळे, आकाश टापरे, ज्ञानेश्वर पायघन, शेख जावेद, प्रशांत वाघमारे सर्व स्थानिक गुन्हे शाखा यांनी केली.