Marmik
Hingoli live News

पावसाने सरासरी ओलांडली! 24 तासात 21 मिलिमीटर पाऊस, सोयाबीन उत्पादक शेतकरी चिंतेत

मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-

हिंगोली – गतवर्षीच्या प्रमाणात यंदा मोठ्या प्रमाणात पाऊस झाला असून आत्तापर्यंत वार्षिक सरासरीच्या 114.45% पावसाची नोंद झाली आहे. 100% होऊन अधिक पाऊस झाला असून मागील 24 तासात 21.50 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. पडणाऱ्या पावसाने सोयाबीन उत्पादक शेतकरी चिंतेत सापडला असून मोठ्या प्रमाणात सोयाबीनचे नुकसान झाले आहे.

जिल्ह्यात आज सकाळी 8.00 वाजेपर्यंत मागील 24 तासांत 21.50 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. तर जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 983.80 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.  जिल्ह्यात आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या 114.45  टक्के इतकी  पावसाची नोंद झाली आहे.

जिल्ह्यात दि. 12 ऑक्टोबर, 2022 रोजी सकाळी 8.00 वाजेपर्यंत मागील 24 तासांत  झालेला पाऊस मिलीमीटर मध्ये तालुकानिहाय पुढीलप्रमाणे आहे. यात कंसांत दिलेले आकडे हे आतापर्यंत पडलेल्या एकूण पावसाचे आहेत.हिंगोली 26.60 (1062.50) मि.मी., कळमनुरी 12.80 (1047.30) मि.मी., वसमत 28.20 (981.10) मि.मी., औंढा नागनाथ 22.40 (936.90) मि.मी, सेनगांव 16.10 (865.20) मि.मी  पाऊस झाला आहे. याप्रमाणे जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 983.80 मि.मी. पावसाची नोंद झाली असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाने कळविले आहे.

पावसाने वार्षिक सरासरी केव्हाच ओलांडली असून पडणाऱ्या पावसाने सोयाबीनचे अतोनात नुकसान होत आहे.

ज्या शेतकऱ्याने सोयाबीन काढली आहे ते शेतकरीही चिंतेत असून ज्या शेतकऱ्यांची सोयाबीन शेतात आहे ती ती सोयाबीन ही शेतात पावसाच्या पाण्याने सडत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला असून प्रशासनाने तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी होत आहे.

Related posts

स्वच्छ जल से सुरक्षा अभियान : जैविक व रासायनिक क्षेत्रीय तपासणी संच वापराबाबत कार्यशाळा

Santosh Awchar

रोजगार मेळाव्यातून दीडशे ते दोनशे युवकांना रोजगार मिळवून देण्याचा आयोजकांचा निर्धार

Jagan

कोरड्या विहिरीत पडलेल्या इसमाचा भूकबळीने मृत्यू

Jagan

Leave a Comment