मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-
हिंगोली – जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कक्ष, जिल्हा रुग्णालय हिंगोली मार्फत अंगणवाडी सेविका यांच्याकरिता 12 ऑक्टोबर रोजी शासकीय परिचारिका महाविद्यालयात एच.आय.व्ही./एड्स कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजेंद्र सूर्यवंशी, ACS डॉ मंगेश टेहरे, RMO डॉ. गोपाळ कदम, जिल्हा कार्यक्रम अधिकारी ज्ञानेश्वर चौधरी व प्राचार्या श्रीमती भालेराव या उपस्थित होत्या.
यावेळी ज्ञानेश्वर चौधरी यांनी उपस्थित सर्व अंगणवाडी सेविका, LHV व नर्सिंग महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींना एचआयव्ही/एड्स वर सखोल मार्गदर्शन करून याचा उपयोग त्यांच्या कार्यक्षेत्रामधील सर्व गरोदर माता व पेशंटला कसा करून देता येईल हे सांगितले.
तसेच सर्व गरोदर माता यांची पहिल्या तिमाहीत नोंदणी करून सर्व तपासण्या करून घेऊन त्यांची डिलिव्हरी ही रुग्णालयातच करून घ्यावी असे आवाहन केले. यावेळी सर्वांना अल्पोपहार देऊन मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देण्यात आले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आशिष पाटील, संजय पवार, बालाजी चाफाकानडे, लक्ष्मी वाठोरे, श्रीमती खंदारे व रुपाली गिरी यांनी परिश्रम घेतले.