Marmik
क्रीडा

हिंगोली जिल्ह्यातील केंद्र व राज्य शासन क्रीडा पुरस्कार प्राप्त खेळाडूंची माहिती 20 ऑक्टोबर पर्यंत सादर करावेत

मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-

हिंगोली – जिल्ह्यातील केंद्र शासन व राज्य शासन क्रीडा पुरस्कार प्राप्त खेळाडूंनी आपली माहिती 20 ऑक्टोबर पर्यंत सादर करावी असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.

हिंगोली जिल्ह्यातील केंद्र शासन व राज्य शासन क्रीडा पुरस्कार प्राप्त खेळाडू, आंतरराष्ट्रीय खेळाडू तसेच विविध खेळांचे क्रीडा मार्गदर्शक यांची माहिती शासनास सादर करावयाची असल्याने हिंगोली जिल्ह्यातील एकविध खेळ संघटना, खेळाच्या विविध संघटनेअंतर्गत खेळातील मागील दहा वर्षातील वर्षनिहाय माहिती संघटनेच्या लेटर पॅडवर खेळाडू, मार्गदर्शक आणि पुरस्कारार्थी यांच्या प्राप्त प्रमाणपत्राच्या सत्यप्रतीसह तसेच शासनाद्वारे आयोजित होणाऱ्या विविध शालेय क्रीडा स्पर्धेत सहभागी राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय प्राविण्यप्राप्त खेळाडूंची माहिती खेळाडूंनी व्यक्तीश: अथवा प्राचार्य/मुख्याध्यापक यांच्या स्वाक्षरीने खेळाडूच्या प्रमाणपत्राच्या सत्यप्रतीसह दि. 20 ऑक्टोबर, 2022 रोजी दुपारी 4.00 वाजेपर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा संकुल, लिंबाळा मक्ता ता.जि.हिंगोली येथे किंवा dsohingoli01@gmail.com या ई-मेल पत्त्यावर सादर करावेत.

ही खेळाडूचे नाव, खेळ प्रकार, पुरस्काराचे नाव/उत्कृष्ट कामगिरी केलेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेचे नाव, खेळाडूचा पत्ता, मोबाईल नंबर, ई-मेल, आधारकार्ड, पालकांचा व्यवसाय, आईचे नाव, आईचा व्यवसाय, क्रीडा मार्गदर्शक यांची पात्रता, नाव, पत्ता, मोबाईल नंबर, शैक्षणिक पात्रता, एनआयएस, डिप्लोमा कोर्स, आंतरराष्ट्रीय खेळाडू, क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार, फक्त कोचिंग बाबतचा अनुभव आदी बाबींचा स्पष्ट उल्लेख असलेल्या नमुन्यात सादर करावी.

ही माहिती संकलन करुन राज्य व केंद्र शासनास सादर करावयाची असल्याने अचूक व वेळेच्या आत सादर करावी. जेणेकरुन सदरची माहिती शासनास सादर करणे सोईचे होईल, असे जिल्हा क्रीडा अधिकारी, हिंगोली यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.  

Related posts

क्रिकेट सामना : एस. पी. 11 संघ ठरला विजेता, नगरपरिषदेचा संघ उपविजेता

Gajanan Jogdand

राष्ट्रीय क्रिकेट चॅम्पियनसाठी प्रणव शिंदे यांची निवड

Gajanan Jogdand

महाराष्ट्र व देशाचे नाव उंचविण्यासाठी अध‍िक परिश्रम करेन – कुस्तीपटू श्रावणी लव्हटे

Gajanan Jogdand

Leave a Comment