Marmik
Hingoli live

डिग्गी व वगरवाडी येथील अनेकांचा बाळासाहेबांच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश

मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-

हिंगोली – महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सर्वसामान्य नागरिकांसाठी घेत असलेल्या कल्याणकारी निर्णयाच्या कार्यशैलीने प्रभावित होऊन व हिंगोली शिवसेना जिल्हाप्रमुख तथा कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार संतोष (दादा) बांगर साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत मौजे डिग्गी व मौजे वगरवाडी येथील अनेकांनी बाळासाहेबांच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.

यावेळी बोलताना आमदार संतोष (दादा) बांगर म्हणाले की राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे हे सर्वसामान्य जनतेच्या हिताचे निर्णय घेण्यासाठी कटिबद्ध असून बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश करणाऱ्या सर्वांच्या पाठीमागे मी ठामपणे उभा राहणार असून त्यांच्या प्रत्येक अडचणीत त्यांच्या प्रत्येक संकटात मी त्यांच्या मदतीसाठी तत्पर राहणार आहे.

यावेळी सुभाषराव बांगर युवा सेना जिल्हाप्रमुख रामभाऊ कदम पंढरी मगर,युवासेना सर्कल प्रमुख माथा प्रदीप गिरी,सुरेश गोरे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बाळासाहेबांच्या शिवसेनेत मौजे वगरवाडी येथील गोसावी समाज तालुकाध्यक्ष तथा माजी सरपंच कैलास गिरी,रामप्रसाद गिरी,लक्ष्मण गिरी,गुणाजी गिरी,गणेश गिरी,संतोष गिरी,अर्जुन गिरी,दत्ता गिरी,अशोक गिरी,राम कदम,गोविंद कर्हाळे,रुस्तुम बोबडे,प्रदीप कदम,सुरेश गिरी,रामगिरी,शाम गिरी,गणेश गिरी,बाळू रणखांबे,पिंटू कदम ,भगवान चव्हाण, कल्याणगिरी तसेच मौजे डिग्गी येथील रवी कांबळे सरपंच डिग्गी, गणेश मस्के, व्‍यंकटी बाभुळकर, आनंदराव धनगर, अंकुश मस्के, शेकुराव धनगर, सुभाष मस्के, विलास धनगर, गजानन गडदे, राजू धनगर, भारत धनगर, यल्लाप्पा धनगर, प्रदीप मस्के उपसरपंच, सखाराम धनगर, प्रताप कांबळे, प्रकाश पुडंगे, साहेबराव मस्के, दत्ता मस्के, गजानन मस्के, ज्ञानेश्वर धनगर, उत्तम इंगोले, मारुती धनगर,गजानन धनगर, शंकर धनगर, देवराव धनगर, शामराव धनगर, चिमणाजी धनगर, नागोराव धनगर, गणेश धनगर, सुरेश धनगर व इतर अनेकांनी यावेळी बाळासाहेबांच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.

Related posts

हिवरा जाटूचे लखन शिंदे यांना ‘आदर्श सरपंच पुरस्कार’ जाहीर

Santosh Awchar

कळमनुरी येथील सराईत गुन्हेगार एका वर्षासाठी स्थानबद्ध! एमपीडीए कायद्याअंतर्गत 10 वी कार्यवाही

Santosh Awchar

गोंडाळ्याच्या शाहरुखचे दादा बनण्याचे स्वप्न भंगले! तलवार काढून धमकावत होता, पोलिसांनी घेतले ताब्यात

Santosh Awchar

Leave a Comment