मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / प्रतिनिधी :-
हिंगोली – घरातील मुले – मुली उच्चशिक्षित झाली आहेत. तरी देखील घारातील एखाद्या व्यक्तीस गंभीर आजाराची लागण झाल्याचे समजल्याने त्या घरातील प्रसन्नता आणि आनंदी वातावरण भंग पावते. असेच सेनगाव तालुक्यातील केंद्रा (बु) या लहानशा गावातील दहा जणांचे कुटुंब असलेल्या डांगे कुटुंबीयांच्या घरात झाले होते. परंतु खासदार हेमंत पाटील यांच्या प्रयत्नाने ५४ वर्षीय महिलेस आरोग्य उपचारासाठी २ लाख ३२ हजार ५०० रुपयाची आर्थिक मदत मिळुन देण्यात यश आल्याने डांगे कुटुंबियांनी खासदार हेमंत पाटील यांचे मनापासून आभार मानले आहेत.
सेनगाव तालुक्यातील केंद्रा (बु) गावातील डांगे कुटुंबातील द्वारकाबाई आत्माराम डांगे (५४) यांना गंभीर आजाराची लागण झाल्याचे निदान झाले होते. त्याच्या आजारावर उपचार करण्यासाठी दोन तीन लाख रुपयाचा खर्च लागणार होता. परंतु कुटुंबाची आर्थिक स्थिती बेताची असल्याने इतका पैसा दमवायचा कसा हा डांगे कुटुंबियांसमोरील सर्वात मोठा प्रश्न होता. तरी देखील आजाराला लागणारा पैसा उभा करण्यासाठी त्यांची धावाधाव सुरु होती.
या दरम्यान खासदार हेमंत पाटील यांच्याशी त्यांनी संपर्क साधला असता खासदार हेमंत पाटील यांनी तत्काळ दखल घेत प्रधानमंत्री राष्ट्रीय सहायता कोषच्या माध्यमातून डांगे कुटुंबियास दोन लाख ३२ हजार ५०० रुपये इतकी अर्थिक मदत मिळवून दिली.
त्यानंतर ५४ वर्षीय द्वारकाबाई डांगे यांच्या वर संभाजीनगर येथील येथील एका प्रसिद्ध कर्करोग रुग्णालयात यशस्वी उपचार करण्यात आले. त्यांना रुग्णालयातुन घरी पाठविण्यात आले असून, त्यांची प्रकृती एकदम ठणठणीत झाल्याने डांगे कुटुंबियांनी खासदार हेमंत पाटील यांनी मिळवून दिलेल्या मदतीबद्दल मनापासून आभार मानले आहेत.