Marmik
Hingoli live

नोबेल पुरस्कार प्राप्त कैलाश सत्यार्थी चिल्ड्रन फॉवडीसेन नवी दिल्ली व कै. मल्हारी आढाव बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने कॅण्डल रॅली

मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / प्रतिनिधी :-

हिंगोली – नोबेल पुरस्कार कैलाश सत्यार्थी चिल्ड्रन फॉवडीसेन नवी दिल्ली व कै. मल्हारी आढाव बहुउद्देशीय स्वभाव संस्थेच्या वतीने 16 ऑक्टोबर रोजी विविध ठिकाणी कॅण्डल रॅली काढून बालविवाह मुक्त भारत अभियान राबविण्यात आले.

हिंगोली जिल्ह्यात कोरोना काळात मोठ्या प्रमाणात बालविवाह प्रकरणे पुढे आली होती. यातील अनेक प्रकरणे व बालविवाह हे सामाजिक कार्यकर्ते तसेच काही संस्थांच्या लक्षात आल्याने रोखण्यात यश आले होते.

जिल्हाधिकारी कार्यालयातील कक्षही यासाठी मेहनत घेत आहे. बालविवाहाचे प्रमाण लक्षात घेता यातून उद्भवणारे विविध प्रश्न आणि सामाजिक स्वास्थ्याचा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. यासाठी बालविवाह रोखणे तसेच बालविवाह आळा घालने गरजेचे आहे.

जिल्ह्यातील काही डोंगराळ व मागासलेल्या भागात मुकाटपणे बालविवाह आटोपले जातात याची कोणालाही कानोखान खबर लागत नाही, मात्र मुलींचे शिक्षण थांबवून होणारे बालविवाह रोकने गरजेचे आहे.

16 ऑक्टोबर रोजी नोबेल पुरस्कार कैलाश सत्यार्थी चिल्ड्रन फॉवडीसेन नवी दिल्ली व कै. मल्हारी आढाव बहुउद्देशीय सेवाभावी संस्था हिवरा यांच्या संयुक्त विद्यमाने विविध ठिकाणी कॅण्डल रॅली काढून बालविवाह मुक्त भारत अभियान राबविण्यात आले.

यावेळी संस्थेच्या पदाधिकारी तसेच उपस्थित नागरिकांनी बालविवाह मुक्त भारताचा नारा दिला. यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थांची उपस्थिती होती.

Related posts

दोन ढाण्या वाघांची मुंबईत ग्रेट भेट

Gajanan Jogdand

जयपूर येथे जल कुंभाचे उद्घाटन; पाईपलाईन साठी 95 लाख रुपये मंजूर

Gajanan Jogdand

भरोसा सेलने 24 संसाराच्या गाठी केल्या घट्ट! मतभेद विसरून पती-पत्नी व सर्व परिवार आनंदाने आला पुन्हा एकत्र

Santosh Awchar

Leave a Comment