मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-
हिंगोली – अमेरिकेतील एमआयटी विद्यापीठात संपूर्ण भारतातून निवडला गेलेला एकमेव विद्यार्थी हिंगोली जिल्ह्यातील आकाश पोपळघट याचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तोंड भरून कौतुक केले. त्यांची ही भेट हिंगोली शिवसेना जिल्हा प्रमुख तथा कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार संतोष दादा बांगर यांनी घडवून आणली.
हिंगोली शिवसेना जिल्हाप्रमुख तथा कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार संतोष (दादा) बांगर यांनी अमेरिकेतील विद्यापीठांमध्ये भारतातील निवडला गेलेला एकमेव गुणवंत विद्यार्थी आकाश गोपाळघट याची राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी भेट घडवून आणली.
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुणवंत विद्यार्थी आकाशचे तोंड भरून कौतुक केले.
यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख रामभाऊ कदम हे देखील उपस्थित होते.