Marmik
Hingoli live Love हिंगोली News

दिवाळीच्या पहिल्याच दिवशी हिंगोलीतील नागरिकांना आंघोळ नाही! नगर परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाचा गलथान कारभार

मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / प्रतिनिधी :-

हिंगोली – आज पासून हिंदू धर्मातील सर्वात महत्त्वाचा सण म्हणून ओळखला जाणारा दिवाळी सण व उत्सवाला सुरुवात झाली आहे आज वसुबारस आहे.

दिवाळीनिमित्त नागरिकांच्या व बच्च्य कंपनीच्या आनंदाला थारा राहिला नसून सर्वत्र आनंद वातावरण आहे. आज पासून दिवाळी स्नानाला विशेष महत्त्व दिले जाते; मात्र शहरातील अनेक नागरिकांना दिवाळीच्या पहिल्याच दिवशी आंघोळ भेटली नाही. त्यास जबाबदार हिंगोली नगर परिषदेचा पाणीपुरवठा हा विभाग असून या विभागाच्या गलथान कारभारामुळे शहरातील अनेक भागांना आज पाचव्या दिवशीही सकाळी पाणी मिळाले नाही.

हिंगोली नगर परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाकडून शहरातील नगरपरिषद कॉलनी, आजम कॉलनी, एनटीसी आधी भागात मागील काही दिवसांपासून चार ते पाच दिवसात पाण्याचे रोटेशन सोडले जात आहे. शहरातील इतर भागांची ही परिस्थिती कमी अधिक प्रमाणात अशीच आहे.

विशेष म्हणजे दर तीन दिवसाआड पाणी सोडले जायचे; मात्र सध्या प्रशासक असल्याने नगरपरिषद प्रशासनाला विचारणारा कोणीच नसल्याने नगर परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाकडून मनमानीपणे चार ते पाच दिवसात पाणी सोडले जात आहे. परिणामी नागरिकांना जिल्ह्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस पडूनही मोठ्या प्रमाणात पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.

नगर परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाला नागरिकांच्या या अडचणीची व मूलभूत प्रश्नांची काही एक देणे घेणे नसल्याचे दिसते. विशेष म्हणजे आज पासून धर्मातील महत्त्वाचा मानला जाणारा सण व उत्सव दिवाळी हा सुरू झाला आहे. आज पासून पहाटेच्या स्नानाला विशेष महत्त्व दिले जाते अनेक ठिकाणी उटणे सुगंधित व विशेष साबणाची वडी लावून आंघोळ केली जाते; मात्र शहरातील अनेक भागातील नागरिकांना नगर परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाच्या गलथान व मनमानी कारभारामुळे दिवाळीच्या पहिल्याच दिवशी पाणी नसल्याने हे स्नान करता आले नाही.

नगरपरिषद मुख्याधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन शहराचा पाणीपुरवठा पहिल्याप्रमाणे दर तीन दिवसाआड सोडण्यास संबंधितांना बजा व्हावे अशी मागणी नागरिकांतून होत आहे. तसेच पाणी पुरवठा विभागातील अधिकाऱ्यांची चौकशी व्हावी अशी मागणी ही केली जात आहे.

Related posts

आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त घेण्यात आलेल्या फेस पेंटिंग स्पर्धेच्या बक्षिसांचे वितरण

Santosh Awchar

Hingoli जैव वैद्यकीय कचरा विल्हेवाटीसाठी आरोग्य विभागाने दक्षता घ्यावी – जिल्हाधिकारी पापळकर

Santosh Awchar

पर्यावरण संतुलनासाठी हिंगोली जिल्ह्यात राबविण्यात येणार अकोला पॅटर्न, एक विद्यार्थी-एक वृक्ष उपक्रम राबविण्याचे आवाहन  

Santosh Awchar

Leave a Comment