मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-
हिंगोली – येथील दोन वर्षाचा सेवेचा कालावधी अतिशय शांततेत व समाधानकारक पूर्ण झाला. जे फक्त जिल्हा पोलीस दलातील सहकारी अधिकारी व अंमलदार तसेच हिंगोली जिल्ह्यातील नागरिक यांच्या सहकार्यामुळेच शक्य झाले असे सांगून जिल्ह्याचे मावळते पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांनी सर्वांचे धन्यवाद मानले. आपण पोलीस म्हणून काम करताना जिल्ह्यातील सर्व घटकातील नागरिकांसाठी तळमळीने काम केले पाहिजे. पोलीस हे आपले मित्र आहेत अशी भावना नागरिकांत निर्माण झाली पाहिजे. यासाठी व विशेष करून समाजात असे काही घटक असतात त्यांना आपलं कोणीच नाही असे वाटते त्यांना पोलीस आपले आहेत, असे वाटले पाहिजे. यासाठी काम करा असे मार्गदर्शन व भावनिक साद जिल्ह्याचे मावळते पोलीस अधीक्षक एम राकेश कलासागर यांनी निरोप समारंभात पोलिसांना घातली.
जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांची प्रशासकीय कारणास्तव हिंगोली येथील बदली झाल्याने 26 ऑक्टोबर रोजी पोलीस अधीक्षक कार्यालय येथील संत नामदेव सभागृहात जिल्हा पोलीस दलाकडून त्यांचा निरोप समारंभाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
सदर कार्यक्रमास अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, सहाय्यक पोलीस अधीक्षक यतीश देशमुख, उपविभागीय पोलीस अधिकारी विवेकानंद वाखारे, किशोर कांबळे सर्व पोलीस ठाण्याचे व शाखेचे अधिकारी तसेच अंमलदार मोठ्या संख्येने उपस्थित होते सदर कार्यक्रमात जिल्हा पोलिसांकडून पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांचा संपत्ती सत्कार करण्यात आला. तसेच त्यांच्या कामकाजाबद्दल व व्यक्तिमत्वाबाबत अप्पर पोलीस अधीक्षक व इतर पोलीस अधिकारी यांनी मनोगत व्यक्त केले ज्यातून वातावरण अत्यंत भावनिक झाले होते.
25 सप्टेंबर 2020 रोजी पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांनी हिंगोली जिल्हा पोलीस अधीक्षक पदाचा पदभार स्वीकारला त्या काळात कोरोना महामारीने मोठ्या प्रमाणात थैमान घातले होते. पोलीस अधीक्षक कलासागर यांनी नागरिकांनी नियमांचे पालन करावे व कोरोनाचा प्रभाव हिंगोली जिल्ह्यात वाढू नये व नागरिकांनी कोणताही त्रास न होता जीवनावश्यक वस्तू व इतर सुविधा मिळाव्यात यासाठी विशेष प्रयत्न केले. सदर काळात बंदोबस्तातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्याही आरोग्याची विशेष काळजी घेऊन जिल्ह्यात या विषाणूचा व्यापक प्रमाणात प्रभाव होऊ नये यासाठी प्रयत्न केले.
सदर काळात संबंध राज्यात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला होता. अशावेळी पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांनी पुढाकार घेऊन हिंगोली पोलीस ठाणे व जिल्ह्यातील कुरुंदा पोलीस ठाणे इत्यादी ठिकाणी रक्तदान शिबिर घेऊन जवळपास 300 पेक्षा अधिक बॅग रक्त संकलन करून जिल्हा सामान्य रुग्णालय येथे पुरवठा केला. सदर रक्तदान शिबिरात पोलीस अधीक्षक कलासागर यांनी स्वतः रक्तदान केले होते.
तसेच मागील दोन वर्षापासून पोलीस अधीक्षक कलासागर यांनी जिल्ह्यात काम करताना पोलीस विभाग अधिकाधिक लोकाभिमुख व जनता पोलीस संवाद वाढेल यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस कार्यवाही व अनेक उपक्रम राबवून प्रयत्न केले. गुन्ह्यांना प्रतिबंध व्हावा गुन्हे घडल्यास त्यात तात्काळ डिटेक्शन व गुन्हेगारांवर जरब राहावी म्हणून प्रतिबंधित कार्यवाही याद्वारे त्यांनी हिंगोली जिल्ह्यात शांतता राहावी म्हणून कार्य केले गंभीर अशा सर्व खुनाचे गुन्हे तात्काळ उघड करून आरोपींना अटक केली.
प्रलंबित गुन्ह्यांचा जलद गतीने निघणारा व्हावा यासाठी वेळोवेळी मोहीम घेऊन तसेच बैठका व मार्गदर्शन करून मोठ्या प्रमाणात प्रलंबित गुन्हे निकाली काढले. याच काळात रिक्षाचे प्रमाण पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांनी कोर्ट पॅरवी तपासीक अंमलदार यांना मार्गदर्शन व बैठका घेऊन जिल्ह्यातील शिक्षेचे प्रमाण वाढविण्यासाठी प्रयत्न केले. तपासाची गती वाढावी म्हणून अभिनेता सुविधा असलेले इन्वेस्टीगेशन कार उपलब्ध करून दिल्या.
मागील दोन वर्षात हिंगोली जिल्ह्यात जबरी चोरी व दरोडा यामधील गुन्हे तात्काळ उघडकीस आणले. ज्यात सुराणा नगर येथील राज्य राखीव पोलीस बल गट हिंगोली येथील जवानाच्या घरातील दरोड्याचा गुन्हा, एसबीआय बँकेतील कर्मचारी यांचे घरी भर दिवसा झालेली जगदीश चोरीचा गुन्हा, राष्ट्रीय महामार्गावरील पार्टी मोड येथील दरोडाचा गुन्हा, चोंडी फाटा येथील बँकेतील फायर करून जबरी चोरीचा गुन्हा, आखाडा बाळापूर व परिसरात सलग झालेले चड्डी बनियन गॅंगचे गुन्हे या व इतर अनेक घरपोडी व जबरी चोरीच्या उन्हात पोलीस अधीक्षक कलासागर यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा व स्थानिक पोलिसांनी सदर केले.
गुन्हेगारांवर जरब रहावी व अटल गुन्हेगार हे गुन्हेगारीपासून परावृत्त व्हावे व समाजात शांतता राहावी म्हणून जिल्ह्यात (1) कलम 55 मु. पो.का. प्रमाणे (06) प्रस्तावामध्ये एकूण 27 इसमांना तडीपार करण्यात आले. (2) कलम 56 मुपोका प्रमाणे 13 अट्टल गुन्हेगारांना तडीपार करण्यात आले तर मुक्का अंतर्गत एकूण तीन इसमाविरुद्ध कार्यवाही करण्यात आली. एम पी डी ए अंतर्गत तीन इस्माविरुद्ध कार्यवाही करण्यात आली.
जिल्ह्यातील नागरिकांना अडचणीच्या वेळी कमीत कमी वेळात मदत मिळावी म्हणून सुरू करण्यात आलेल्या 112 या प्रकल्पासही अधिक गतिमान केले. जिल्हा नियोजन समितीतून सदर डायल 112 प्रकल्पासाठी 15 सुविधायुक्त चार चाकी वाहने व 35 दुचाकी वाहनांची खरेदी करून ते जिल्ह्यात सर्व पोलीस ठाणे यांना वाटप करून सदर प्रकल्प अधिकारी बळकट केले.
हिंगोली जिल्ह्यात महामार्गावरील होणारी चोरीचे प्रमाण अपघाताचे प्रमाण तसेच पोलीस मदत तात्काळ मिळावी यासाठी एकूण सहा सेक्टरमध्ये सुसज्ज चारचाकी वाहनातून सेक्टर पेट्रोलिंग सुरू केले. जिल्ह्यात होणारे चोरीचे प्रमाण कमी करणे तसेच इतर अवैध कार्यवाहीवर आळा घालण्यासाठी प्रभावी रात्रगस्त होण्यासाठी e बीट प्रणाली कार्यान्वित केली तसेच जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात ग्राम सुरक्षा दलांची स्थापना करण्यासाठी प्रोत्साहन दिले.
नागरिकांना अडचणीच्या काळात तात्काळ व जवळ मदत मिळावी म्हणून तसेच तणावाच्या वेळी पोलिसांची मदत तात्काळ मिळावी या दृष्टीने जिल्ह्यात हिंगोली शहरात रीसाला बाजार परिसर, मच्छी मार्केट परिसर, अकोला बायपास, चोंडी फाटा, जिंतूर टी पॉईंट कळमनुरी शहरातील बस स्थानक परिसर इत्यादी ठिकाणी सर्व सुविधा नियुक्त पोलीस चौकांची निर्मिती केली. जिल्ह्यात सामाजिक व जातीय सलोखा अबाधित राहावा म्हणून शांतता समितीच्या बैठका एकता क्रिकेट चषकाचे आयोजन व स्वतः संवेदनशील भागात भेट इत्यादी माध्यमातून प्रयत्न करून मागील काळात हिंगोली जिल्ह्याची शांतता अबाधित ठेवली.
गेल्या दोन वर्षाच्या काळात कोरोना महामारी काळात व या वर्षीच्या सर्व उत्सव हिंगोली जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनात अत्यंत शांततेत व कोणतेही गालबोट न लागता संपन्न झाले जिल्ह्यातील नागरिकांना विविध विषयांवरील तक्रार अर्ज विविध कार्यालयात प्राप्त होतात तर असे तक्रार अर्जावर तत्काळ कार्यवाही होऊन संबंधितांचे समाधान व्हावे यासाठी प्रत्येक गुरुवारी तक्रार निवारण दिनाचे आयोजन करून अर्जाची निर्गती केली.
पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांनी सामाजिक दायित्वाची जाणीव ठेवत मागील दोन वर्षात नागरिकांना सोबत घेऊन अनेक लाविन्यपूर्ण असे उपक्रम यशस्वीरित्या जिल्ह्यात राबविले जात जननी कार्यक्रम, भरोसा सेल, दामिनी पथकाची स्थापना, जिल्ह्यात होणारे प्राणांतिक व इतर रस्ते अपघाताचे प्रमाण कमी व्हावे तसेच वाहन चालक व नागरिकांमध्ये सुरक्षित वाहन चालविणे व वाहतूक निर्माण बाबत जागृती निर्माण व्हावी म्हणून व्यापक प्रमाणात जिल्ह्यात रस्ता सुरक्षा अभियान तसेच सुरक्षेसाठी व पुरावा म्हणून वापराकरिता अधिकाधिक विशेषता बाजारपेठ परिसर व नागरी वस्ती सीसीटीव्ही कॅमेरे बसविले पाहिजेत या उद्देशाने पोलीस अधीक्षक कलासागर यांच्या संकल्पनेतून एक सीसीटीव्ही कॅमेरा माझ्या शहरासाठी हा उपक्रम राबविला गेला. ज्यातून हिंगोली शहर व जिल्ह्यात नागरिकांनी पोलीस अधीक्षक यांच्या आव्हानाला प्रतिसाद देत 500 पेक्षा अधिक सीसीटीव्ही कॅमेरे जिल्ह्यात बसविले. तसेच सर्वसामान्य नागरिक व पोलिसांमधील असे संवाद वाढला पाहिजे, नागरिकांनी ही संकोच पोलिसांना माहिती दिली पाहिजे यासाठी समाधान हेल्पलाइन नंबर सुरू केली.
हिंगोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नागरिकांचे तक्रार अर्ज हे शेतीशी संबंधित तसेच जमिनीच्या वादाशी संबंधित असतात. अशावेळी नागरिकांना त्यांच्या शंकाचे निरसन सहज होईल व त्यांना त्यांचे अर्जानुसार त्यांच्या प्रश्न कोठून व कसा सोडवावा याबाबतची कार्यवाही यासाठी मार्गदर्शन मिळेल याकरिता पोलीस अधीक्षक कार्यालय येथे प्रॉपर्टी सेलची स्थापना केली.
पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन वसमत शहराने एसओ नामांकन मिळविले. पोलीस स्टेशन हिंगोली शहर येथे बालस्नेही पोलीस स्टेशन हा उपक्रम सुरू करण्यात आला. सन 2022 मध्ये पोलीस अधीक्षक कलासागर यांच्या मार्गदर्शनाखाली हिंगोली येथे यशस्वीरित्या व भव्य असा 27 वा नांदेड परिक्षेत्रीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन यशस्वीरीत्या करण्यात आली.
पोलीस कल्याण मागील दोन वर्षाच्या काळात पोलीस अधीक्षक कलासागर यांनी जिल्हा पोलिसांसाठी उपयुक्त असे अनेक कल्याणकारी योजना राबविल्यावर निर्णय घेतले. त्यांच्या मार्गदर्शनास संकल्पनेतून पोलीस मुख्यालय हिंगोली येथील पोलीस कवायत मैदानाची शोभा वाढविणारा तसेच परेड मार्चसाठी आवश्यक असलेला भव्य असा किल्ला बांधण्यात आला.
पोलीस अधिकारी व अंमलदार यांना सवलतीच्या दरात घरगुती संसार उपयोगी सर्व साहित्य एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी नवीन पोलीस कल्याण सबसिडअरी कॅन्टीन इमारत बांधकाम करून कॅन्टीन सुरू केले. पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे कार्यालयात असलेले प्रलंबित प्रकरणे व काम हे जलद गतीने व्हावे म्हणून त्यांच्यासाठी समाधान हेल्पलाइन सुरू करून काम केले.
पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे आरोग्य उत्तम राहिलेले पाहिजे, त्यांना असलेल्या आरोग्याच्या समस्यांबाबत निदान झाले पाहिजे म्हणून तज्ञ वैद्यकीय अधिकारी व सर्व उपकरणांसह मेडिकल कॅम्पचे आयोजन केले. त्यातून जवळपास 600 पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी वैयक्तिक तपासणी करून घेतली व जनता संबंध अधिकाधिक जवळ करण्यासाठी हिंगोली पोलीस दलाची कार्यक्षमता वाढावी म्हणून व हिंगोली पोलीस दल अधिकारी सक्षम करण्यासाठी प्रयत्न केले.
पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांनी हिंगोली पोलीस दल व संबंध हिंगोली जिल्ह्यासाठी केलेले कार्य व प्रेम सर्वांच्या नेहमी स्मरणात राहील. या कार्यक्रमास मोठ्या संख्येने पोलिस अधिकारी कर्मचारी व नागरिकांची उपस्थिती होती.