मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / प्रतिनिधी :-
हिंगोली – तत्कालीन अपर जिल्हाधिकारी रामनारायण लक्ष्मीनारायण गगराणी हे हिंगोलीमध्ये कार्यरत असतांना त्याच्याकडे जिल्हाधिकारी पदाचा अतिरिक्त पदभार असतांना तलाठी, ग्रामसेवक व लिपीक पदाची भरती प्रक्रिया तीन वेळा टप्याटप्याने भरती प्रक्रिया घेऊन या भरती प्रक्रियेमध्ये अनेक गैरव्यवहार करुन कोट्यावधीचा भ्रष्ट्राचार केलेला आहे. या सह हिंगोली जिल्ह्यातील शासकीय गावठान, गायरान, स्मशान भुमीच्या जमिनी काही बांधकाम व्यवसायीक यांच्याशी संगनमत करुन 7/12 मध्ये दुरुस्ती करुन त्यांच्या नावावर करुन मोठ्या प्रमाणावर भ्रष्ट्राचार करत शासनाचे कोट्यावधीचे नुकसान केलेले आहे, तसेच कमी अधिक 50,000/- प्रत्येक प्रकरणात निकाल देण्यासाठी लाच घेऊन व आर्थिक गैरव्यवहार करुन कोट्यावधीची चल अचल संपत्ती जमा केलेली आहे. ते शासकीय सेवेवर रुजु झाल्याच्या दिनांकापासुन आजपर्यंतच्या त्यांच्या व त्यांच्या कुटुंबियाच्या मालमत्तेची सखोल चौकशी करुन कठोर शिक्षा करावी अशी मागणी विराट राष्ट्रीय लोक मंच कौन्सिलच्या वतीने करण्यात आली आहे.
लाच लुचपत प्रतिबंधक ब्युरोचे पोलीस उपअधिक्षक श्री राजेंद्र पाटील यांच्या फिर्यादीवरुन श्री रामनारायण लक्ष्मीनारायण गगराणी व ईतरांविरुध्द फक्त तुटपुंज्या स्वरुपाची म्हणजे 28 लाख 72 हजार 360 रुपयाची बेहिशोबी मालमत्ता आढळुन आली म्हणुन त्यांच्या व त्यांच्या कुटुंबियाविरुध्द गुन्हा दाखल करुन त्यांना ताब्यात घेण्यात आलेले आहे.
रामनारायण लक्ष्मीनारायण गगराणी हे हिंगोली जिल्ह्यामध्ये सन 2014 ते 2016 मध्ये अपर जिल्हाधिकारी म्हणुन कार्यरत होते, त्यांच्याकडे पुरवठा विभागासंबंधी सर्व कार्ये पाहण्याची जवाबदारी तसेच जमीनी संदर्भातील वाद विवाद पाहण्याची जवाबदारी सोपविण्यात आलेली होती, त्याचप्रमाणे काही कालावधीकरिता जिल्हाधिकारी पदाचा अतिरिक्त पदभारसुध्दा सोपविण्यात आला होता.
या कालावधीमध्ये रामनारायण गगराणी यांनी जिल्हा परिषद व जिल्हाधिकारी कार्यालय येथील रिक्त पदासंबंधीची तलाठी, ग्रामसेवक व लिपीक पदाची भरती प्रक्रिया तिन वेळा टप्याटप्याने पुर्ण केली. या भरती प्रक्रियेमध्ये अनियमीतपणे व आर्थिक गैरव्यवहाराच्या जोरावर संनगमत करुन अनेक गैरप्रकार करत काही अयोग्य लाभार्थ्यांची निवड करुन कोट्यावधीचा भष्ट्राचार करुन मोठ्या प्रमाणावर चल अचल संपत्ती जमा केलेली आहे. यासंबंधी अनेक उमेदवारांनी तक्रार दाखल केलेल्या होत्या.
त्याचप्रमाणे रामनारायण गगराणी यांनी हिंगोली जिल्ह्यातील काही बांधकाम व्यवसायीकांशी संगनमत करुन शासकीय गायरान, गावठान, स्मशान भुमीच्या जागेमध्ये 7/12 मध्ये दुरुस्ती करुन कोट्यावधीची शासकीय जमीनी त्या बांधकाम व्यवसायीकांचे नावे करुन यामध्येही भ्रष्ट्राचार करत मोठ्या प्रमाणावर चल अचल संपत्ती जमा केलेली आहे.जमीनीसंबंधी वाद विवाद प्रकरणामध्ये निर्णयासाठी कमी अधिक 50,000/- रुपये घेऊन निकाल देण्याची प्रक्रिया अवलंबण्यात आली होती ज्यामध्ये अनेक अनियमीतपणे निर्णय देऊन यामध्येही लाखो रुपयाचा भ्रष्ट्राचार करुन चल अचल संपत्ती जमा केलेली आहे.
अश्याप्रकारे रामनारायण लक्ष्मीनारायण गगराणी यांनी हिंगोली जिल्ह्यामध्ये तसेच ईतर ठिकाणी कार्यरत असतांना अनेक अनियमीतपणे कामे करुन कोट्यावधीचा भ्रष्ट्राचार करुन चल अचल संपत्ती जमा केलेली आहे. सदर संपत्ती ही स्वतंच्या नावाने खरेदी न करता त्यांचा मुलगा, पत्नी, त्यांचे माहेरचे व सासरचे नातेवाईक व विश्वासु व्यक्ती यांच्या नावाने खरेदी करण्यात आलेली आहे.यातील अल्प उदाहरण म्हणजे जयराम मोटर्स रॉयल इनफिल्ड या नावाने नांदेड येथे बुलेट गांड्याचे शो रुम त्यांच्या मुलाच्या नावाने सुरु करण्यात आले होते, ज्यामध्ये कोट्यावधीची गुंतवणुक करण्यात आली होती.
नागार्जुन हॉटेलजवळ आनंद नगर नांदेड या परिसरात भव्य ईमारत उभारण्यात आली होती यामध्ये कोट्यावधीचा खर्च करण्यात आला होता. त्याचप्रमाणे त्यांच्या नातेवाईकांच्या नावावर अनेक मोक्याच्या जमीनी खरेदी करुन कोट्यावधीची चल अचल संपत्ती जमा करुन शासनाचा मोठ्या प्रमाणावर नुकसान केलेला आहे.असे असतांना त्यांच्याविरुध्द फक्त तुटपुंज्या स्वरुपाची म्हणजे 28 लाख 72 हजार 360 रुपयाची बेहिशोबी मालमत्ता मिळाली म्हणजे अपुर्ण तपासावर दाखल केलेला गुन्हा आहे असे वाटते.
या प्रकरणा मध्ये रामनारायण लक्ष्मीनारायण गगरानी हे शासकीय सेवेमध्ये नियुक्त झाल्यापासुन आजपर्यंत त्यांच्या, त्यांचे कुटुंबिय व जवळचे नातेवाईक, त्यांच्या सासरची मंडळी यांच्या मालमत्तेची सखोल चौकशी करुन कडक कारवाई करण्यात यावी आणि संबंधिताच्या मालमत्ता जप्त करुन त्यांना व त्यांना सहकार्य करणाऱ्या लोकाविरुध्द गुन्हा दाखल करुन त्यांनाही जास्तीत जास्त शिक्षा करुन भ्रष्ट्राचाऱ्यांना कडक संदेश देण्यात यावा असे निवेदन गृह सचिव, महासंचालक Acb,विभागीय आयुक्त, औरंगाबाद,पोलीस अधीक्षक Acb नांदेड,जिल्हाधिकारी हिंगोली यांना ई-मेल द्वारा करून विनंती करण्यात आली.
या निवेदनवर संस्थापक अध्यक्ष शेख नईम शेख लाल, राष्ट्रीय संचालक शेख नौमान नवेद नईम, जिल्हा कार्याध्यक्ष शेख बासित,उपाध्यक्ष रवि जैस्वाल, जिल्हा प्रमुख महासचिव शेख शाहनवाज, महासचिव सतीश लोणकर,शहर अध्यक्ष साजिद खान, तालुका अध्यक्ष शेख अवेज,वि. स. जिल्हा अध्यक्ष शेख अफरोज,जावेद चाऊस, आमेर बागबाण आदींच्या सह्या आहेत.