Marmik
Hingoli live

बेकायदेशीर रित्या हत्यार बाळगणाऱ्या विरुद्ध दहशतवाद विरोधी शाखेची कार्यवाही

मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-

हिंगोली – जिल्हा पोलीस अधीक्षक श्री.जी. श्रीधर यांच्या आदेशाने हिंगोली जिल्ह्यात अवैध धंदे व बेकायदेशीर रित्या शस्त्र मला विरुद्ध कार्यवाहीसाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.

या मोहिमेअंतर्गत 8 नोव्हेंबर रोजी दहशतवाद विरोधी शाखेला पेट्रोलिंग दरम्यान मिळालेल्या माहितीवरून हिंगोली शहरातील खुशाल नगर परिसरातील करीमखा हबीबखा पठाण हा दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने त्याच्याजवळ हत्यार बाळगून असल्याच्या माहितीवरून दहशतवाद विरोधी शाखेतील अधिकारी व अंमलदार यांनी खुशाल नगर परिसरात जाऊन सदरील इसम करीमखा हबीबखा पठाण वय 35 वर्ष याच्या ताब्यातून एक धारदार अशी लोखंडी गुप्ती (20 इंच लांब) व धारदार लोखंडी कोयता (23 इंच लांब) असलेले हत्यार जप्त केले.

सदरील इसमा विरुद्ध सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश मलपिल्लू यांच्या तक्रारीवरून हिंगोली शहर पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा कलम 4, 25 अन्वय गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कार्यवाही जिल्हा पोलीस अधीक्षक श्री.जी. श्रीधर, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांच्या मार्गदर्शनाखाली दहशतवाद विरोधी शाखेचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश मलपिल्लू, पोलिसांमलदार शैलेश चौधरी, धनंजय पुजारी शेख शफीयोद्दीन, अर्जुन पडघन, विजय घुगे यांनी केली.

Related posts

बारावीचा निकाल : गुणवत्तेचा टक्का वाढला

Santosh Awchar

पिंपळदरी शेत शिवारात आढळला गांजा! एक लाख 89 हजार 184 रुपयांचा मुद्देमाल जप्त

Santosh Awchar

पोलीस भरती : खटकाळी बायपास ते अकोला बायपास महामार्गावर होणार 1600 मीटर धावण्याची मैदानी चाचणी, वाहतुकीसाठी महामार्ग राहणार बंद

Santosh Awchar

Leave a Comment