Marmik
Hingoli live News महाराष्ट्र

रेल्वेप्रश्नी हिंगोली कर आक्रमक; उद्या रेल्वेरोको व जिल्हा बंद आंदोलन

मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-

हिंगोली – जिल्ह्यातील रेल्वे प्रश्नावर हिंगोलीकरांचा राग आजच्या बैठकीत दिसुन आला. दिनांक 23 नोव्हेंबर रोजी रेल्वे प्रश्नावर जिल्हा बंद व रेल्वे रोको अंदोलनावर शिक्कामोर्तब करण्यात आले.

हिंगोली मार्गे जाणारी जालना – छपरा एक्सप्रेस वळविण्यात आली ती ठरल्या प्रमाणे हिंगोलीकरांच्या हक्काची असल्याने पूर्णा – हिंगोली – मार्गानेच सुरू करण्यात यावी तसेच वाशिम – हिंगोली या रेल्वे मार्गावर मुंबईला जाण्या करता एक ही रेल्वे नसल्याने मुंबई साठी रेल्वे सुरू करण्यात यावी वहिंगोली येथील रेल्वे स्टेशन परिसरात मोठी रिकामी जागा आहे.

त्या ठिकाणी व्यापार पेठेला आवश्यक असलेले गुड्स शेड तातडीने मंजूर करून उभारण्यात यावेत, वसमत रेल्वे स्टेशन वरील प्लॕटफॉर्म नं. मालधक्का म्हणून वापर ला जात आहे. त्याऐवजी प्लॅटफॉर्म नंबर दोन चे पुनर्निर्माण करून प्रवाशा करता सर्व सुविधा युक्त प्लॅटफॉर्म निर्माण करावा या मागण्या घेऊन हिंगोली जिल्हा बंद व रेल्वे रोको आंदोलन करण्यात येणारच असल्याचे प्रमुख व्यापारी, पत्रकार , विविध राजकीय सामाजिक संघटनाचे प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत शिकामोर्तब करण्यात आले आहे.

ह्या आंदोलनात सहभागी होण्या करता सर्वांनी २३ तारखेला सकाळी ८.३० वाजता गांधी चौकात जमा होऊन रेल्वे स्टेशन कडे जावयाचे असल्याने व्यापाऱ्यांनी आप आपली प्रतिष्ठान बंद करून यात सहभागी व्हावे, असे ठरविण्यात आले.

बैठकीस जेठानंद मेनवाणी, प्रकाशचंद्र सोनी, विनायकराव भिसे पाटील,प्रमोद उर्फ बंडू कुटे,अनिल नेणवाणी, गजेंद्र बियाणी,शेख नईम शेख लाल ,रवींद्र वाढे, शेख खलील बेलदार, माबूद बागवान, सत्तार बागबान, सुनील शेठ मानका, शहानवाज हुसेन, आनंद निलावार, इमरान खान,बबन शिखरे, शेख आवेज,साजिद पठाण,जावेद चाऊस,हकीम बागबाण,सत्तार बागबाण,शेख नौमान नवेद आदींसह अनेक व्यापारी विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते

Related posts

सेनगाव येथून दोघे दोन वर्षासाठी हिंगोली जिल्ह्यातून हद्दपार

Santosh Awchar

…अन भाऊराव पाटलांनीही थोपटले दंड! जनता, कार्यकर्त्यांना वाटू लागले हायसे

Gajanan Jogdand

विराट राष्ट्रीय लोकमंच कौन्सिलचे 27 डिसेंबर पासून विधानभवनासमोर उपोषण

Gajanan Jogdand

Leave a Comment