मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-
हिंगोली – महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोशारी व शुद्धांशु त्रिवेदी यांच्या विरोधात काँग्रेस पक्षाच्या वतीने आज 23 नोव्हेंबर रोजी दुपारी बारा वाजता गांधी चौक येथे आंदोलन करण्यात आले. यावेळी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बाबत अपमान जनक वक्तव्य करणारे राज्यपाल भगतसिंग कोशारी व शुद्धांशु त्रिवेदी यांचा जाहीर निषेध करण्यात आला.
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बाबत राज्यपाल भगतसिंग कोशारी व शुद्धांशी त्रिवेदी यांनी आपमानजनक वक्तव्य केले आहे.
सदरील वक्तव्याचा राज्यभरातून निषेध केला जात आहे. हिंगोली येथे हिंगोली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने 23 नोव्हेंबर रोजी दुपारी बारा वाजता महात्मा गांधी चौक येथे आंदोलन करून राज्यपाल भगतसिंग कोशारी व शुद्धांशु त्रिवेदी यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध करण्यात आला.
यावेळी माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर, जिल्हाध्यक्ष दिलीप देसाई, माजी शिक्षण सभापती संजयभैय्या देशमुख यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.