मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-
हिंगोली – अवैध धंद्या विरोधी कार्यवाही विशेष मोहिमेत दहशतवाद विरोधी शाखेच्या पथकाने पेट्रोलिंग दरम्यान प्रतिबंधित सुगंधित पान मसाला व तंबाखू यावर कार्यवाही केली.
अवैध धंद्या विरोधी कार्यवाही विशेष मोहिमेत दहशतवाद विरोधी शाखेच्या पथकाने पेट्रोलिंग दरम्यान हिंगोली शहरातील महादेववाडी परिसरात नामे – शेख सिकंदर शेख मुजीब याचे ताब्यातून शासनाने प्रतिबंधित केलेला केसरयुक्त विमल, राजनिवास पानमसाला व तंबाखू च्या पुड्या कीं 10 हजार 400 रु. व एक स्कुटी कीं.50 हजार रु. असा एकूण 64 हजार 400 रु. चा मुद्देमाल जप्त करून नमुद इसमाविरुद्ध पोस्टे हिंगोली शहर येथे कलम 328,272,273,188 भादवी व अन्नसूरक्षा अधिनियमाच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात येत आहे.
सदरची कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक हिंगोली श्री. जी. श्रीधर यांचे मार्गदर्शनात सहा.पोलीस निरीक्षक राजेश मलपिलु पोलीस अंमलदार शैलेश चौधरी, शेख शफि्योद्दीन, अर्जुन पडघन, विजय घुगे, महेश बंडे यांनी केली